जैन समाजातर्फे अयोध्येत राेज ५ हजार भाविकांना भोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 07:56 AM2024-01-22T07:56:21+5:302024-01-22T07:56:40+5:30

पाच तीर्थंकरांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात जैन समाजही आनंदाने सहभागी झाला आहे.

Ayodhya Raj food for 5 thousand devotees by Jain community | जैन समाजातर्फे अयोध्येत राेज ५ हजार भाविकांना भोजन

जैन समाजातर्फे अयोध्येत राेज ५ हजार भाविकांना भोजन

कोल्हापूर : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जैन समाजातर्फे अयोध्येतील जैन मंदिर परिसरात दररोज ५ हजार भाविकांना भोजन देण्यात येत असून हा उपक्रम २४ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

पाच तीर्थंकरांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात जैन समाजही आनंदाने सहभागी झाला आहे. सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण अयोध्येतील गनिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी आणि जंबुद्वीप हस्तिनापूरचे पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामीजी यांना देण्यात आले आहे.

श्री दिगंबर जैन अयोध्या तीर्थक्षेत्र समितीतर्फे दररोज ५ हजार भाविकांना भोजनाचा उपक्रम १५ जानेवारीपासून सुरू आहे, अशी माहिती अ.भा. दिगंबर जैन युवा परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व कोल्हापूर शाखेचे कार्याध्यक्ष अभिषेक पाटील यांनी दिली.

Web Title: Ayodhya Raj food for 5 thousand devotees by Jain community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.