जिल्ह्यातील ८० अंगणवाडी, सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिकांना पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 12:05 IST2021-06-24T11:54:28+5:302021-06-24T12:05:19+5:30
Zp Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने ८० अंगणवाडी, पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस यांना आदर्श अंगणवाडी पुरस्कार जाहीर करण्यात आले. सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांनी ही माहिती दिली.

कोल्हापुरात महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभेत आदर्श पर्यवेक्षिकांचा सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांच्या हस्ते पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले, कल्पना चौगले, आकांक्षा पाटील, वंदना मगदूम, संगीता हळदे उपस्थित होत्या.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने ८० अंगणवाडी, पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस यांना आदर्श अंगणवाडी पुरस्कार जाहीर करण्यात आले. सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांनी ही माहिती दिली.
कोरोनामुळे पुरस्कार वितरण सोहळा तालुका पातळीवर घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यातील पर्यवेक्षिकांचा बुधवारी झालेल्या महिला बालकल्याण समितीच्या सभेत पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. सेविकांना सहा हजार रुपये, पमिनी सेविकांना पाच हजार तर मदतनीस यांना चार हजार रुपये, प्रमाणपत्र आणि शिल्ड असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
- सन २०१९-२० आदर्श पर्यवेक्षिका पुरस्कार
अश्विनी आकुर्डे, वडणगे २, वैशाली सामंत पडळ १, सुनीता प्रभू कानुर, छाया कोहाडे उदगाव, शंकुतला कोळेकर हेरले, मंदाकिनी कदम पट्टणकोडोली १
- अंगणवाडी सेविका व मदतनीस
सविता सावंत, कविता चव्हाण उत्तूर १, छाया कालेकर,सरिता मस्कर पुष्पनगर, प्रेमा सडाके, सुवर्णा कुंभार, राजगोळी खु.,पारू बुध्याळी, शोभा कांबळे कवळीकट्टी, विद्या कांबळे, योगिता पोतदार तिसंगी, अर्चना हावळे, महादेवी गवळी, खोतवाडी,कुसुम परीट,संगीता साळुंखे रांगोळी, राजाक्का मगदूम, पदाबाई कुंभार नागांव, उज्वला ठोके, राधिका कोरे पाडळी बु., वैशाली लोहार, मंगल जत्राटे, हमिदवाडा, आक्काताई बाळीकाई, रंजना अडगळे माणगाव, प्राजक्ता कांबळे, जयश्री शिंदे नेबापूर, साऊताई पाटील वर्षा इंगवले माजगाव, कलावती येळवणकर, सुलभा ढाळके पुसाळे, यासीन मुल्लाणी, उज्वला बंडगर शिरटी, सुनंदा भागवत, चंपा कांबळे यड्राव
- मिनी सेविका
स्वाती सरदेसाई सातेवाडी, भारती पाटील वेतवडे पैकी धनगरवाडा, रंजना जोगम म्हासूर्लीपैकी बाजारवाडा
- आदर्श पर्यवेक्षिका २०२०/२१
ज्योती कांबळ केखले २, नीलम पोवार भुये, स्वप्निला गुरव भुये २, श्रेया लगारे पट्टणकोडोली ३
- अंगणवाडी सेविका, मदतनीस
मीना दिवटे, संगीता गोविलकर वडकशिवाले, स्नेहा डांगे, गीता पाटील फयेपैकी जोशेवाडी, विद्या माडुळकर, शैला धुमदाळे चंदगड, शिवाक्का डोणेवाडी, अर्चना दरेकर चन्नेकुपी, अनिता वरेकर, संगीता तळेकर बुवाचीवाडी, इंदूबाई शिंदे, वैशाली भाटे वाठार त. वडगव, मीनाक्षी पोवार, सुजाता कांबळे पट्टणकोडोली, छाया सुतार, मोहनाताई भाटे कुरूकली, मंगल पाटील, रेश्मा पाटील चिंचवडे तर्फ कळे, शशिकला पोवार, शालन पोवार बाचणी, रेखा पाटील, सविता माने उचगाव, रूपाली पाटील, रेणुका गुरव आळवे, सुजाता घाटगे, प्रतिभा घाटगे क. वाळवे, आनंदी नांगरे पाटील, मनीषा पाटील सरूड, सुजाता शिंदे, संगीता कोरे उमळवाड, रेखा पाटील, मीनाताई पाटील टाकळी
- मिनी अंगणवाडी सेविका
सुरेखा पाटील नार्वेकरवाडी, सविता लोखंडे हिरलगे, शमशाद पन्हाळकर चौगलेवाडी