शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

भाजीपाल्याचे दर अजून चढेच, पेरू, डाळिंबांचे ढीग, दरही उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 5:13 PM

पाऊस, पूरस्थिती आणि बंद झालेली रस्ते वाहतूक यांमुळे मंदावलेली भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात सुधारली तरी दर मात्र अजूनही चढेच आहेत.

ठळक मुद्देभाजीपाल्याचे दर अजून चढेचपेरू, डाळिंबांचे ढीग, दरही उतरले

कोल्हापूर : पाऊस, पूरस्थिती आणि बंद झालेली रस्ते वाहतूक यांमुळे मंदावलेली भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात सुधारली तरी दर मात्र अजूनही चढेच आहेत. घाऊक बाजारात भाजीचा सरासरी ४० ते ५०, तर किरकोळ बाजारात ८० रुपये किलोचा दर राहिला आहे. पुरामुळे ऐन श्रावणात भाजीपाल्याची महागाई अनुभवायला मिळत आहे.गेल्या आठवडाभर जोरदार पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे शेतातील भाजीपाला काढता येत नाही. काढला तरी तो बाजारात पोहोचविण्यासाठी रस्तेच सुरू नाहीत. नदीलगत असणाऱ्या शिवारांत तर अजून पाणी असल्याने पीक पाण्याखाली जाऊन कुजू लागले आहे. या सर्वांमुळे रविवारी बाजारात भाजीपाला खूपच कमी दिसत होता. मालच कमी आल्याने दरही वाढवण्यात आले होते.दर किलोमध्ये

  • टोमॅटो ४० ते ६०
  • वांगी ६० ते ७०
  • ओली मिरची ६०
  • ढबू मिरची ६०
  • भेंडी ५० ते ६०
  • कारली ५० ते ६०
  • ओला वाटाणा ८० ते १००
  • दोडका ७० ते ८०
  • बिनीस ६० ते ७०
  • फ्लॉवर २५ ते ४० रुपये गड्डा
  • कोथिंबीर १५ ते २५ रुपये पेंढी
  • मेथी २० ते २५ रुपये पेंढी
  • कांदा पात व पालक १० ते १५ रुपये पेंढी 

ज्वारी महागलीआवक आणि मालवाहतुकीचे कारण सांगत ज्वारी आणि गव्हाचे दर वाढवण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात ४० रुपये असणारी ज्वारी आता ५० रुपयांवर गेली आहे. एक नंबर शाळू ५६ रुपये प्रतिकिलो झाला आहे. गहूही वाढला आहे. ३० ते ३२ रुपयांचा गहू आता ३५ ते ३६वर गेला आहे.डाळिंब, सीताफळांचे ढीगफळबाजारात सीताफळ आणि पेरूची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कडेला आणि कोपऱ्या-कोपऱ्यांवर विक्रेते ढीग लावून ही फळे विकताना दिसत आहेत. किलोचा दर ३० ते ५० रुपये असा आहे.

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर