शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वीजबिल माफीसाठी कृती समितीचा हिसका, महावितरणला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 19:05 IST

mahavitaran, morcha, kolhapurnews लॉकडाऊन काळातील वीज बिलमाफीसाठी वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याने मंगळवारी सर्वपक्षीय कृती समितीने महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकत सर्व व्यवहार बंद पाडून हिसका दाखवला. कर्मचाऱ्यांना आत सोडण्यावरून आंंदोलकांची पोलीसांबरोबर झटापटही झाली. पोलिसांकडून अटकसत्र सुरू झाल्यानंतरही तब्बल चार तास मुख्य कार्यालयासमोर ठिय्या मारत वीज बिल माफी झालीच पाहिजे या घोषणेने परिसर डोक्यावर घेतला.

ठळक मुद्देमहावितरणला टाळे, कृती समितीचा हिसका वीजबिल माफीसाठी सर्वपक्षीय कृती समितीची गांधीगिरी

 कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील वीज बिलमाफीसाठी वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याने मंगळवारी सर्वपक्षीय कृती समितीने महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकत सर्व व्यवहार बंद पाडून हिसका दाखवला. कर्मचाऱ्यांना आत सोडण्यावरून आंंदोलकांची पोलीसांबरोबर झटापटही झाली. पोलिसांकडून अटकसत्र सुरू झाल्यानंतरही तब्बल चार तास मुख्य कार्यालयासमोर ठिय्या मारत वीज बिल माफी झालीच पाहिजे या घोषणेने परिसर डोक्यावर घेतला.लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीज बिले असल्याने जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. सर्वपक्षीय कृती समिती, राज्य इरिगेशन फेडरेशन,यांनी मंगळवारी महावितरणच्या जिल्ह्यासह राज्यातील सर्व कार्यालयांना टाळे ठोकणार असल्याचा इशारा १३ जुलैला झालेल्या आंदोलनावेळी दिला होता; पण शासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर संताप अनावर झालेल्या जनतेने महावितरणलाच टाळे ठोकून चार तासांहून अधिक काळ सर्व व्यवहार बंद पाडले.

आंदोलकांत रोष इतका होता की महावितरणचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांना स्वत: रस्त्यावर येत ठिय्या मारलेल्या आंदोलकांसमोर येऊन निवेदन स्वीकारावे लागले. हा राज्याच्या धोरणात्मक पातळीवरील निर्णय आहे, तरीदेखील वीज बिल भरले नाही म्हणून घरगुती, शेतीचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही दिली.दुपारी अकरा वाजता आंदोलन सुरू होणार होते, पण कर्मचारी आत गेले तर आंदोलनाची तीव्रता कळणार नाही म्हणून आंदोलकांनी सकाळी नऊ वाजता ताराबाई पार्कातील महावितरणचे कार्यालय गाठले आणि मुख्य गेटलाच कुलूप लावले. दुपारी आंदोलन होणार म्हणून पोलीसही गाफिल राहिले. दहा वाजता कर्मचारी येऊ लागले तसा गोंधळ वाढला.

पोलिसांनी धाव घेत कुलूप काढण्याचा प्रयत्न केला, यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. अटक सत्र सुरू केल्यानंतर तर आंदोलक आधिकच आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांच्या वाहनांसमोरच ठिय्या मारला. कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन बाहेरच थांबविण्यात आले. चार तास हे कर्मचारी बाहेरच ताटकळतच राहिल्याने कार्यालयीन कामाचा पुरता बोजवारा उडाला.आंदोलनात मारुती पाटील, बाबासोा देवकर, बाबा पार्टे, भारत पाटील, चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील, जयकुमार शिंदे, चंद्रकांत यादव, बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, आर. जी. तांबे, राजेंद्र पाटील, विशांत महापुरे, संदीप देसाई, सुभाष देसाई, संभाजीराज जगदाळे, सुभाष जाधव, अशोक पोवार, रमेश मोरे, सुभाष पाटील यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूरMorchaमोर्चा