शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

काझींना न्याय देण्यास सभागृह दणाणले

By admin | Updated: July 21, 2015 01:03 IST

शाळेस भेट न दिल्याने आयुक्तांचा निषेध

कोल्हापूर : शाळेचे मुख्याध्यापक, क्लार्क अन् शिपाई अशी तिहेरी भूमिका पार पाडणारे महापालिकेच्या रात्रशाळेतील प्रभारी मुख्याध्यापक एस. एच. काझी यांना कधी न्याय देणार, असा सवाल उपस्थित करीत नगरसेवक राजेश लाटकर, सचिन खेडेकर व सतीश घोरपडे यांनी सोमवारच्या सभेत प्रशासनाला धारेवर धरले. काझी यांना फरकासह रक्कम मिळावी, असा प्रस्ताव तीन महिन्यापूर्वी पाठवूनसुद्धा आयुक्तांनी शाळेस भेट न दिल्याने आयुक्तांचा निषेध केला. महापालिकेच्या कर्मवीर भाऊराव पाटील रात्रप्रशालेतील प्रभारी मुख्याध्यापक एस. एच. काझी हे गेली वीस वर्षे तुटपुंज्या पगारावर राबत आहेत. ‘रात्रशाळेत उजेड आणता-आणता त्यांच्या आयुष्यात काळोख’ या मथळ््याखाली सोमवारी (दि. १३ जुलै) ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन नगरसेवकांनी सोमवारी सभागृह दणाणून सोडले. प्रशासनाला अशा संवेदनशील विषयावर कधी जाग येणार, असा सवालही नगरसेवकांनी उपस्थित केला. राजेश लाटकर व शारंगधर देशमुख यांनी काझी प्रश्नाकडे सर्वांत प्रथम सभागृहाचे लक्ष वेधले. याप्रकरणी सहायक आयुक्त शीला पाटील यांच्याकडे वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनाकडून थंड प्रतिसाद असल्याचे नगरसेवक सतीश घोरपडे यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत काझी यांना पंधरा दिवसांत मागील फरकांसह वेतनवाढ मिळालीच पाहिजे, रात्रशाळा व्यवस्थित चालावी यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करावे, अशी जोरदार मागणीही घोरपडे यांच्यासह सभागृहाने केली. काझी प्रकरणाचा सर्व तपशीलांसह प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वीच आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे पाठविला आहे. आयुक्त स्वत: रात्रशाळेला भेट देणार आहेत. आयुक्तांना याविषयी दोनवेळा आठवणही करून दिली. आयुक्तांकडेच काझी यांचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे शीला पाटील यांनी सभागृहास सांगितले. पाटील यांच्या उत्तरावर सभागृह आयुक्तांच्या कार्यप्रणालीवर तुटून पडले.