घरफाळा घोटाळ्याचे ऑडिट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:21 IST2021-01-22T04:21:38+5:302021-01-22T04:21:38+5:30
कोल्हापूर : घरफाळा घोटाळ्याचे ऑडिट करा, घरफाळा सॉफ्टवेअर रद्द करा, या मागणीसाठी गुरुवारी आपने महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण केले. ६५०० ...

घरफाळा घोटाळ्याचे ऑडिट करा
कोल्हापूर : घरफाळा घोटाळ्याचे ऑडिट करा, घरफाळा सॉफ्टवेअर रद्द करा, या मागणीसाठी गुरुवारी आपने महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण केले.
६५०० मिळकती इनव्हॅलिड दाखवण्यात आल्या असून, त्यांची वसुली करावी. या प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली.
'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई म्हणाले, महानगरपालिकेतील घरफाळा वसुलीमध्ये अनेक गैरव्यवहार झाले आहेत. संगणकीय प्रणालीमध्ये बदल करून करपात्र मिळकतींची आकारणी कमी करणे, अनागोंदी करून घरफाळ्यात सूट देणे असे प्रकार झाले आहेत. याचबरोबर मिळकतीच्या क्षेत्रफळ सर्वेक्षणात घोळ, एकाच करदात्याला दुबार बिले देऊन त्रास देणे, बनावट दुबार पावत्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करत महापालिकेचे प्रचंड आर्थिक नुकसान करण्यात आले आहे. घरफाळा घोटाळा नेमका किती झाला याच्या माहिती होऊन नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी २००७ पासून आतापर्यंतच्या त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करण्यात यावे.
फोटो : २१०१२०२१ आम आदमी पार्टी न्यूज
ओळी : कोल्हापुरात आम आदमी पक्षाच्या वतीने घरफाळा घोटाळ्यासंदर्भात महापालिकेसमोर उपोषण केले.