Kolhapur Crime: एएस ट्रेडर्सच्या संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव, ४२ बँक खाती गोठवली
By उद्धव गोडसे | Updated: March 18, 2025 12:30 IST2025-03-18T12:29:16+5:302025-03-18T12:30:27+5:30
१२ जणांच्या १९ मालमत्तांचा समावेश

Kolhapur Crime: एएस ट्रेडर्सच्या संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव, ४२ बँक खाती गोठवली
उद्धव गोडसे
कोल्हापूर : गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एएस ट्रेडर्स कंपनीच्या १२ संचालकांच्या १९ मालमत्तांचा लिलाव होणार आहे. यात फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेले प्लॉट, फ्लॅट, घरे, शेतजमीन आणि वाहनांचा समावेश आहे.
संशयित आरोपींची बहुतांश मालमत्ता कोल्हापूर शहरासह पाडळी खुर्द (ता. करवीर), कोडोली (ता. पन्हाळा), गगनबावडा, गडहिंग्लज येथील आहेत. संचालकांनी त्यांच्या नातेवाइकांच्या नावे खरेदी केलेल्या मालमत्ताही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सुमारे १३ कोटी रुपयांच्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया राबविण्याची परवानगी राज्याच्या प्रधान सचिवांनी दिली आहे.
यांच्या मालमत्तांची झाली जप्ती
- विजय जोतिराम पाटील (रा. खुपिरे, ता. करवीर) - कोल्हापूर - ई वॉर्ड - २ फ्लॅट, डी वॉर्ड - प्लॉट
- बाबू कृष्णा हजारे (रा. विद्यानगर, कोल्हापूर) - वंदूर (ता. कागल) - शेतजमीन
- अमित अरुण शिंदे (रा. शिवाजी पार्क, कोल्हापूर) - पाडळी खुर्द येथील बिगरशेती ३ प्लॉट आणि पळसंबे (ता. गगनबावडा) येथील शेतजमीन
- नामदेव जिवबा पाटील (रा. फुलेवाडी) - गगनबावडा तालुक्यातील मौजे खोकुर्ले येथील शेतजमीन आणि मौजे कोदे येथील शेतजमीन
- श्रुतिका वसंत पाटील आणि शिवाजी वसंत पाटील (रा. कोल्हापूर) - ई वॉर्ड कोल्हापूर येथील फ्लॅट
- दत्तात्रय विश्वनाथ तोडकर (रा. कोडोली) - कोडोली येथील घर
- साहेबराव सुबराव शेळके (रा. कोल्हापूर) - बुधवार पेठ (ता. पन्हाळा) येथील सव्वातीन गुंठ्यांचा प्लॉट
- राजेश मारुती पाडळकर (रा. पाचगाव) - पाचगाव येथील प्लॉट आणि घर, कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथील प्लॉट
- भिकाजी शिवाजी कुंभार (रा. माळ्याची शिरोली, ता. करवीर) - हरीओमनगर येथील प्लॉट आणि घर
- अमर सुधाकर पाटील (रा. कोल्हापूर) - कोल्हापुरातील ए वॉर्ड येथील एक गुंठ्याचा प्लॉट
- अश्विनी अनंतराव देसाई (रा. गडहिंग्लज, प्रवीण विजय पाटील याची नातेवाईक) - गडहिंग्लज येथील २७८ चौरस मीटरचा प्लॉट
- संगीता दत्तात्रय तोडकर (रा. कोडोली) - कोडोली येथील प्लॉट आणि घर
बँक खाती गोठवली
एएस ट्रेडर्स डेव्हल्पर्स, एएस ट्रेडर्स सोल्युशन, कॉमर्सिओ व्हायब्रंट, जेनेरिओ व्हेंचर्स, ट्रेक्झम व्हेंचर्स, ट्रेडविंग्ज सोल्युशन, कॅपिटस ट्रेडर्स या कंपन्यांसह विजय पाटील, सुवर्णा सरनाईक, प्रवीण पाटील, दीपक मोहिते, बाबू हजारे, आक्काताई हजारे, आदी ४२ जणांची बँक खाती पोलिसांनी गोठवली आहेत. यातील सुमारे दोन कोटींची रोकड पोलिसांनी जप्त केली.
यांची वाहने जप्त
विजय पाटील - बुलेट १
अमित शिंदे - कार २
संतोष मंडलिक - कार १
प्रवीण पाटील - कार १
चांदसो काझी - कार १
दत्तात्रय तोडकर - कार १, दुचाकी १
बाळासो धनगर - बुलेट १, कार १
बाळासो धनगर - २ दुचाकी
लोहितसिंग सुभेदार - कार १
राजेश पाडळकर - कार १
मुख्य सूत्रधार लोहितसिंगची एक कार जप्त
या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार याची इनोव्हा क्रिस्टा कार पोलिसांनी जप्त केली. त्याच्या पुण्यातील मालमत्ता आणि जप्त केलेले दागिने यांचा उल्लेख दुसऱ्या टप्प्यातील लिलाव प्रक्रियेत केला जाणार आहे. इतरांच्या जप्त केलेल्या वाहनांमध्ये महिंद्रा एक्सयुव्ही, थार, सफारी अशा महागड्या कारचा समावेश आहे.