शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न, कोल्हापुरातील गांधीनगरात तणाव; व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून नोंदवला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 11:37 IST

जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार

गांधीनगर : गांधीनगर (ता. करवीर) येथे ६ वर्षांच्या मुलीवर १३ वर्षांच्या मुलाने चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर संशयित मुलाला जमावाने पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित मुलावर बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ही बातमी गांधीनगरात पसरताच पोलिस ठाण्यासमोर नागरिकांचा मोठा जमाव जमला होता.याबाबतची माहिती अशी, शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घराशेजारी खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीला अल्पवयीन मुलाने चॉकलेटचे आमिष दाखवून जवळच असलेल्या घराच्या गच्चीवर नेले. त्या ठिकाणी तो मुलगा तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करीत होता. यावेळी त्या मुलीची आई मुलीला शोधू लागली. घराजवळील सीसीटीव्हीचे फूटेज तपासले असता मुलीला तो मुलगा जिन्यावरून नेत असल्याचे दिसले.

मुलीची आई आणि शेजारी गच्चीवर गेले असता त्या ठिकाणी मुलगी आणि मुलगा दिसून आले. मुलगा नग्न अवस्थेत होता. यावेळी मुलीच्या आईने आरडाओरडा केल्यावर परिसरातील नागरिक जमले. त्यांनी मुलाला मारहाण करीत पोलिस स्टेशनला आणले. तोपर्यंत ही बातमी गांधीनगरात पसरली. ही बातमी समजताच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून पोलिस स्टेशनकडे धाव घेतली. बघता बघता पोलिस स्टेशनसमोर शेकडो लोकांचा जमाव जमला. सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी जमावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, संशयित आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आणि लोकप्रतिनिधी, वरिष्ठ पोलिस अधिकारी येत नाहीत तोपर्यंत हलणार नाही, अशी भूमिका जमावाने घेतली.जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी पोलिस स्टेशनला भेट दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांचे जलद कृती दल पाचारण केले. यानंतर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि पंकज गिरी, गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सपोनि दिगंबर गायकवाड, कागल पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक करपे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळंमकर आदींसह फौजफाटा दाखल झाला. दरम्यान, आमदार ऋतुराज पाटील, भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी पीडित मुलीच्या पालकांना भेटून धीर दिला. यानंतर सिंधी सेंट्रल पंचायतमध्ये झालेल्या शांतता बैठकीत आमदार ऋतुराज पाटील, शौमिका महाडिक यांनी जमावाला शांततेचे आवाहन करून पोलिसांना दोषींवर कडक कारवाईच्या सूचना दिल्या. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस