शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: इन्स्टाग्रामवरून फूस लावून दोन मुलींना पळविण्याचा प्रयत्न, चंदगड पोलिसांच्या सतर्कतेने दोघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 13:53 IST

चंदगड : इन्स्टाग्रामवरून फूस लावून चंदगड येथील दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या रोमिओंना गुरुवारी सतर्कमुळे त्यांना अवघ्या दोन तासांतच ...

चंदगड : इन्स्टाग्रामवरून फूस लावून चंदगड येथील दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या रोमिओंना गुरुवारी सतर्कमुळे त्यांना अवघ्या दोन तासांतच चंदगड पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले. याप्रकरणी दोघा युवकांवर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. साहिल प्रभळकर (वय २०), सकलेन शेख (२० दोघेही रा. चंदगड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत गेली नसल्याचे समजताच फिर्यादीने घटनेचे गांभीर्य ओळखून ही बाब पोलिसांनी कळविली. त्यानंतर पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी तत्परतेने चार वेगवेगळी पथके तयार करून मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली.  त्यानंतर बेपत्ता मुलीच्या मैत्रिणीकडे विचारपूस केल्यावर आणखीन एक मुलगी गायब असल्याचे समोर आले. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चंदगडमधीलच दोन युवक बेपत्ता मुलीच्या घराजवळच सकाळी चकरा मारत होते. अशी माहिती समोर आली. त्यानंतर संशयितांना मोबाईलवर संपर्क साधला असता त्यामधील एकाला चंदगडमधून तर एकाला दाटे येथून पोलिस पथकाने ताब्यात घेतले.दरम्यान, त्या मुलींनी आपण हलकर्णी येथे आलो असून अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून ही माहिती संशयित तरुणांना दिली. मात्र, आपण पळून जाणार ही बाबच पोलिसांना समजल्याचे त्यांनी मुलींना सांगताच त्यांनी सरळ चंदगड गाठले. पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच या प्रकरणाचा छडा लावला.अनोळखींवर विश्वास ठेवू नकाकुठली घटना घडली तरी पोलिसांशी संपर्क करा तसेच अशा घटना घडू नयेत म्हणून पालकांनी आपल्या पाल्यांचे समुपदेशन करावे व सोशल मीडियावरून संपर्कात आलेल्या अनोळखी युवकांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरInstagramइन्स्टाग्रामCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस