धक्कादायक! कळंबा कारागृहातील कैद्यांना गांजा, मोबाईल पुरविण्याचा पुन्हा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 18:50 IST2020-12-23T18:48:48+5:302020-12-23T18:50:59+5:30

Jail CrimeNews- कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना पुन्हा एकदा गांजा पुरविण्याचा प्रयत्न झाला. तेथील सुरक्षा यंत्रणा पुन्हा चव्हाट्यावर आली. चारचाकी वाहनातून दोघा अज्ञातांनी सुरक्षा भिंतीवरून तीन गठ्ठे कारागृहाच्या आतील आवारात फेकल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.

Attempt to supply cannabis and mobile phones to inmates of Kalamba Jail | धक्कादायक! कळंबा कारागृहातील कैद्यांना गांजा, मोबाईल पुरविण्याचा पुन्हा प्रयत्न

धक्कादायक! कळंबा कारागृहातील कैद्यांना गांजा, मोबाईल पुरविण्याचा पुन्हा प्रयत्न

ठळक मुद्देकळंबा कारागृहातील कैद्यांना गांजा, मोबाईल पुरविण्याचा पुन्हा प्रयत्नगांजा, मोबाईल, पेनड्राईव्हचे तीन गठ्ठे सुरक्षा भिंतीवरून आत फेकले

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना पुन्हा एकदा गांजा पुरविण्याचा प्रयत्न झाला. तेथील सुरक्षा यंत्रणा पुन्हा चव्हाट्यावर आली. चारचाकी वाहनातून दोघा अज्ञातांनी सुरक्षा भिंतीवरून तीन गठ्ठे कारागृहाच्या आतील आवारात फेकल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.

कारागृहातील सुरक्षारक्षकांनी तातडीने संबधित गठ्ठे ताब्यात घेतले. तिन्हीही गठ्ठ्यात एकूण पाऊण किलो गांजा, दहा मोबाईल संच, दोन पेनड्राईव्ह, पाच चार्जिंग कॉड असा सुमारे १५ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत जुना राजवाडा पोलिसांत अज्ञात दोघांविरोधात गुन्हा नोंदविला.

मंगळवारी कोल्हापूर ते गारगोटी मार्गावरील कारागृहाची तटबंदी क्र. १ समोरील फूटपाथनजीक चारचाकी वाहन थांबले. त्यातून दोघे उतरले. त्यांनी तीन मोठे गठ्ठे कारागृहाच्या उंच भिंतीवरून आत फेकले. त्यानंतर वाहन निघून गेले. हे कारागृह सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ते गठ्ठे ताब्यात घेतले. प्रत्येक गठ्ठ्यात कमी-जास्त प्रमाणात गांजा, मोबाईल संच आदी सुमारे १५ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल आढळला.

 

Web Title: Attempt to supply cannabis and mobile phones to inmates of Kalamba Jail