राजू बेगच्या २० कोटींच्या मालमत्तेवर टाच आणण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 15:32 IST2020-09-22T15:31:30+5:302020-09-22T15:32:41+5:30
राजारामपुरीतील गोल्ड म्युझियमचा राजू बेग याच्या सुमारे वीस कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिली. फसवणूक प्रकरणाची त्याच्याकडे चौकशी सुरू असताना ही माहिती पुढे आल्याचेही त्यांनी सांगितले.

राजू बेगच्या २० कोटींच्या मालमत्तेवर टाच आणण्याचे प्रयत्न
कोल्हापूर : राजारामपुरीतील गोल्ड म्युझियमचा राजू बेग याच्या सुमारे वीस कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिली. फसवणूक प्रकरणाची त्याच्याकडे चौकशी सुरू असताना ही माहिती पुढे आल्याचेही त्यांनी सांगितले.
निरीक्षक इंदलकर यांनी सांगितले की, राजू बेग हा बेळगाव येथील उद्योगपती असून त्याने केलेल्या फसवणूक प्रकरणी त्याच्याकडे चौकशी सुरू केली आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने काही मालमत्तेची विक्री केल्याचे चौकशीत आढळले आहे. त्याच्याकडे सुमारे २० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती चौकशीत दिसून आली आहे.
फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने ती विक्री केल्यामुळे ती पुन्हा ताब्यात घेण्याबाबत माहिती घेतली जात आहे. दरम्यान, त्यांच्या पत्नीकडेही सोमवारी चौकशी होणार होती. मात्र त्या उपस्थित राहिल्या नाहीत. याबाबतचा चौकशी अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.