शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

Kolhapur News: डोक्यात दगड घालून खून, कळंबा कारागृहातील हल्लेखोर कैद्याची येरवड्यात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 12:42 IST

मृत कैद्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी इन कॅमेरा करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला

कोल्हापूर : कळंबा कारागृहात झोपेत असलेला कैदी सतपालसिंग जोगिंदरसिंग कोठाडा (वय ३९, रा. सायन, मुंबई) याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी कारागृह प्रशासनाने संशयित आरोपी गणेश लक्ष्मण गायकवाड (वय २९, रा. वाशी, मुंबई) याची सोमवारी (दि. ६) पुण्यातील येरवडा कारागृहात रवानगी केली. कारागृहात घडलेल्या खुनाच्या घटनेबद्दल ड्यूटीवरील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती कारागृह अधीक्षकांनी दिली.कळंबा मध्यवर्ती कारागृहात रविवारी (दि. ५) पहाटे कैद्यानेच एका कैदी मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्यामुळे खळबळ उडाली होती. चेष्टामस्करी केल्याच्या रागातून जीवघेणा हल्ला करणारा कैदी गणेश गायकवाड याची कारागृह प्रशासनाने तातडीने सोमवारी पुण्यातील येरवडा कारागृहात रवानगी केली. तसेच खुनाच्या घटनेची स्वतंत्र समितीकडून चौकशी करण्यात आली. चार सदस्यीय समितीने ड्यूटीवरील चार रक्षक, दोन वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि १० कैद्यांची चौकशी करून २७ पानांचा अहवाल कारागृह अधीक्षक प्रभारी पांडुरंग भुसारी यांच्याकडे सोपवला.मृतदेह नातेवाइकांकडे सोपवलाप्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, मृत कैदी सतपालसिंग कोठाडा याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी सीपीआरमध्ये इन कॅमेरा करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला, अशी माहिती कारागृह अधिकाऱ्यांनी दिली.शिस्तीसाठी प्रयत्नकळंबा कारागृहातील बिघडलेली शिस्त आणि कैद्यांकडून होत असलेल्या गंभीर गुन्ह्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. कैद्यांवर वचक राहावा, त्यांच्यातील गटबाजी संपावी आणि हिंसक वृत्ती कमी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती कारागृह अधीक्षक प्रभारी भुसारी यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस