शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सहायक वनसंरक्षक पदाच्या परीक्षेत अव्वल :अभ्यासातील सातत्य हेच यशाचे गमक : कसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 21:21 IST

चर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद जिद्द, कष्ट आणि अभ्यासातील सातत्य हेच माझ्या यशाचे गमक आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या वन विभागात काम करण्याची संधी मिळाल्याचा खूप आनंद होत आहे. - लक्ष्मण कसेकर

ठळक मुद्देपदवीच्या शिक्षणासाठी केंद्र सरकारची इन्सपायर स्कॉलरशिप मिळाली होती. .

संतोष मिठारी ।राज्य वनसेवा परीक्षेत देवर्डे (ता.आजरा) येथील लक्ष्मण महादेव कसेकर याने सहायक वनसंरक्षक पदाच्या परीक्षेत राज्यात अव्वलस्थान पटकावले. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील या युवकाने मिळविलेल्या यशाने कोल्हापूरचा ठसा राज्यपातळीवर उमटला आहे. या पार्श्वभूमीवर लक्ष्मण याच्याशी साधलेला थेट संवाद.

प्रश्न : स्पर्धा परीक्षेत करिअर करण्याची प्रेरणा कशी मिळाली?उत्तर : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना माझा करिअरबाबतचा कल माझे मोठे भाऊ रामचंद्र आणि प्राथमिक शाळेतील शिक्षक पांडुरंग शिपूरकर यांनी जाणला. त्यांनी मला स्पर्धा परीक्षा हा करिअरसाठी उत्कृष्ट पर्याय असल्याचे सांगितले. आजरा परिसरातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थी या परीक्षांमध्ये यश संपादन करीत होते. ते पाहून आपणही या परीक्षांमध्ये यश मिळवू शकतो, असा आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला.

प्रश्न : या परीक्षेचे स्वरूप कसे आहे?उत्तर : राज्य वनसेवा परीक्षा ही ‘एमपीएससी’च्यावतीने घेतली जाते. या परीक्षेचे पूर्व, मुख्य आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात. पूर्व परीक्षा शंभर गुणांची असते. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, चालू घडामोडी आणि आकलन क्षमता या विषयांचा समावेश असतो. मुख्य परीक्षा चारशे गुणांची असते. त्यामध्ये सामान्य अध्ययन आणि जनरल सायन्स अँड नेचर काँझर्वेशन असे दोन पेपर असतात. ५० गुणांसाठी मुलाखत असून, त्यामध्ये व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेतली जाते.या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर सहायक वनसंरक्षक (गट अ), वनक्षेत्रपाल (गट ब) या पदांवर काम करण्याची संधी मिळते.

प्रश्न : वनसेवा परीक्षेची तयारी कशी केली?उत्तर : आजरा महाविद्यालयातून बी.एस्सी. अभ्यासक्रमाची पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. मी नियमितपणे रोज सात ते आठ तास अभ्यास केला. राज्य वनसेवा परीक्षेत यश मिळवू शकलो. मुंबईतील ‘एसआयएसी’, पुणे येथील ‘यशदा’ आणि कोल्हापूरमधील प्री आयएएस ट्रेनिंग सेंटर या संस्थांमध्ये मार्गदर्शन घेतले. माझ्या यशात आई, वडील, भाऊ, वहिनी यांच्यासह शिक्षक पांडुरंग शिपूरकर, दीपक अतिग्रे यांचा मोलाचा वाटा आहे.शैक्षणिक पार्श्वभूमी

लक्ष्मण याच्या कुटुंबाची दोन एकर शेती आहे. वडील शेती करतात. आई गृहिणी आहे. भाऊ रामचंद्र यांची ‘एमपीएससी’च्यावतीने करसहायकपदी निवड झाली आहे. लक्ष्मण याचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर देवर्डेमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण आजरा हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. दहावीत त्याने ९३.६९ टक्के गुणांसह, तर बारावीमध्ये ८५ टक्के गुणांसह आजरा केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला होता. ९१.६८ टक्के गुणांसह त्याने बी.एस्सी.ची पदवी घेतली. त्याला पदवीच्या शिक्षणासाठी केंद्र सरकारची इन्सपायर स्कॉलरशिप मिळाली होती. .

टॅग्स :kolhapurकोल्हापूर