Kolhapur: सहाय्यक तलाठी ऑन ड्युटी 'फुल्ल टाइट', आमदार आवाडेंनी केली कारवाईची मागणी-video
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 16:31 IST2025-10-31T16:30:00+5:302025-10-31T16:31:38+5:30
कोल्हापूर : आमदारांच्या पाहणी दौऱ्यात सहाय्यक तलाठीच ऑन ड्युटी 'फुल्ल टाइट' असल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये हा ...

Kolhapur: सहाय्यक तलाठी ऑन ड्युटी 'फुल्ल टाइट', आमदार आवाडेंनी केली कारवाईची मागणी-video
कोल्हापूर : आमदारांच्या पाहणी दौऱ्यात सहाय्यक तलाठीच ऑन ड्युटी 'फुल्ल टाइट' असल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकारामुळे आमदारांचा पारा चांगला चढला. अन् संबंधित अधिकाऱ्यावर थेट कारवाई करण्याची मागणी केली.
आमदार खासदार, मंत्री ज्यावेळी दौऱ्यावर येतात तेव्हा शासकीय अधिकारी, कर्मचारी वेळेत हजर असतात. इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे विकासकामाच्या पाहणी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना सहाय्यक तलाठी ऑन ड्युटी फुल्ल टाइट मद्यधुंद असल्याचे पाहायला मिळाले. आनंदा डवरी असे या सहाय्यक तलाठ्याचे नाव आहे. कार्यालयीन कामाच्या वेळेत तलाठी मद्यधुंद दिसताच आमदार आवाडे यांनी थेट कारवाई करण्याची मागणी केली आहे. 
कोल्हापुरच्या इचलकरंजी मध्ये घडलेली ही घटना धक्कादायक आहे. जर शासकीय कर्मचारीच जर कार्यालयीन कामाच्या वेळेत नको त्या अवस्थेत आढळत असतील तर नागरिकांची कामे कशी करणार हा सवाल आता उपस्थित होत आहे.