शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

दोन लाखांची लाच घेताना मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्तास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 10:47 IST

Bribecace, Crime News, Police, kolhapur अतिवृष्टीमुळे जलाशयातील मासे व मासे उत्पादनासाठी झालेल्या नुकसानीची शासनाकडून भरपाई मिळवून दिल्याबद्दल तक्रारदारांकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तथा प्रभारी सहायक आयुक्ताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी रंगेहात पकडले.

ठळक मुद्देलक्ष्मीपुरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई मत्स्य उत्पादन संस्थेला नुकसानभरपाई देण्यासाठी मागितली लाच

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे जलाशयातील मासे व मासे उत्पादनासाठी झालेल्या नुकसानीची शासनाकडून भरपाई मिळवून दिल्याबद्दल तक्रारदारांकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तथा प्रभारी सहायक आयुक्ताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी रंगेहात पकडले.

प्रदीप केशव सुर्वे (रा. ब्ल्यू अपार्टमेंट, कारंडेमळा, कोल्हापूर. मूळ गाव-तांदूळवाडी, माळशिरस, जि. सोलापूर) असे त्या संशयिताचे नाव आहे. ही कारवाई लक्ष्मीपुरी परिसरातील एका कार्यालयात केली.विभागाने दिलेली माहिती, सुर्वेकडे कसबा बावडा येथील मत्स्त्य व्यवसाय कार्यालयात मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तथा प्रभारी सहायक आयुक्तपदाचा कार्यभार आहे. तक्रारदार यांचा मत्स्य उत्पादनाचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे दोन जलाशय ठेके तत्त्वावर आहेत.

२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या जलाशयातील मासे व मासे उत्पादनासाठी लावलेल्या जाळ्या वाहून गेल्या होत्या. यानंतर राज्य शासनाने पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाई जाहीर केली. तक्रारदारांच्या संस्थेच्या जलाशयांचे महसूल विभागामार्फत रीतसर पंचनामे केले होते. नुकसानभरपाई मिळण्यासाठी सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता.

प्रस्तावानुसार शासनाने तक्रारदारांच्या संस्थेस माशांची नुकसान भरपाई म्हणून २६ लाखांची रक्कम त्यांच्या संस्थेच्या बँक खात्यावर सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयामार्फत दि. १४ सप्टेंबरला जमा केली. पण, अद्याप त्यांना मत्स्य जाळ्यांची नुकसानभरपाई मिळाली नाही.दरम्यान, आठवडाभरापूर्वी तक्रारदारांची संशयित प्रभारी सहायक आयुक्त सुर्वेची भेट झाली. त्यावेळी सुर्वेने कार्यालयामार्फत पाठविलेल्या प्रस्तावामुळेच २६ लाख रुपये भरपाई मिळाली. त्याबदल्यात १० लाख रुपये सुर्वेने त्यांच्याकडे मागितले. नाहीतर उर्वरित नुकसानभरपाईची रक्कम मिळणार नसल्याचे सांगितले. सात लाख रुपये व तडजोडीनंतर तक्रारदारांकडे पाच लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी पहिला हप्ता दोन लाख व नंतर उरलेले देण्यास सांगितले.तक्रारदारांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे लाचेची तक्रार केली. त्याची विभागाने पडताळणी केली. दरम्यान, गुरुवारी संशयित सुर्वेने तक्रारदारांना फोन करून लक्ष्मीपुरी परिसरात त्यांची भेट घेतली. त्यांच्याकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना सापळा रचलेल्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. ही कारवाई उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, कर्मचारी शरद पोरे, अजय चव्हाण, रूपेश माने, मयूर देसाई व चालक सूरज अपराध यांनी केली. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर