शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

अष्टमीला अंबाबाई महिषासुरमर्दिनी रूपात - रात्री नगरप्रदक्षिणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 7:08 PM

Navratri, kolhapur, ambabaitemple, dasra शारदीय नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेला अष्टमीनिमित्त शनिवारी कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. रात्री साडेनऊ वाजता देवीची वाहनातून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. यंदा कोरोनामुळे सजविलेल्या ट्रॅक्टरमधून हे वाहन नेण्यात आले.

ठळक मुद्दे अष्टमीला अंबाबाई महिषासुरमर्दिनी रूपातरात्री नगरप्रदक्षिणा, दसरा सोहळा रद्द

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेला अष्टमीनिमित्त शनिवारी कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. रात्री साडेनऊ वाजता देवीची वाहनातून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. यंदा कोरोनामुळे सजविलेल्या ट्रॅक्टरमधून हे वाहन नेण्यात आले.नवरात्रौत्सवात अष्टमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी सर्व देवांच्या तेजातून प्रकटलेल्या अष्टा दशभुजा अंबाबाईने म्हणजे दुर्गेने महिषासुराचा संहार केला होता. भारतातील ५१ शक्तिपीठांच्या यादीत करवीरसाठी करवीरे महिषमर्दिनी असा उल्लेख येतो. जगदंबेने महिषासुरमर्दिनीचे उग्र रूप घेतले.

शक्तिपीठांच्या परंपरेप्रमाणे करवीरक्षेत्री आदिशक्तीचे स्वरूप असणाऱ्या माता सतीचे त्रिनेत्र पडले तेथे देवीने महिष मर्दिनीरूपाने विहार केला, अशी आख्यायिका आहे. तिला अनुसरूनच नवरात्राच्या या अष्टमीला करवीरनिवासिनीची महिषासुरमर्दिनी रूपातील अलंकार पूजा बांधली जाते. ही पूजा प्रसाद लाटकर व श्रीनिवास जोशी यांनी बांधली. शाही दसरा सोहळा रद्ददरवर्षी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळा होतो. येथे अंबाबाई, तुळजाभवानी देवींच्या पालख्या येतात. छत्रपतींच्या उपस्थितीत शमीपूजन होते. यंदा कोरोनामुळे हा शाही दसरा सोहळा रद्द करण्यात आला आहे. प्रातिनिधिक स्वरूपात शमीपूजन होईल. 

टॅग्स :Navratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर