गंगामाई वाचन मंदिराच्या अध्यक्षपदी अशोक बाचूळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:55+5:302021-01-20T04:25:55+5:30
अध्यक्ष डॉ. सुधीर मुंज यांनी वाचनालयाने वर्षभरात केलेल्या कामकाजाचा आढावा स्वागत व प्रास्ताविकातून सांगितला. विषयपत्रिका वाचन कार्यवाह इराण्णा पाटील ...

गंगामाई वाचन मंदिराच्या अध्यक्षपदी अशोक बाचूळकर
अध्यक्ष डॉ. सुधीर मुंज यांनी वाचनालयाने वर्षभरात केलेल्या कामकाजाचा आढावा स्वागत व प्रास्ताविकातून सांगितला. विषयपत्रिका वाचन कार्यवाह इराण्णा पाटील यांनी केले.
आर्थिक पत्रकांचे वाचन सुभाष विभुते यांनी केले. मागील सभेचे इतिवृत्त वामन सामंत यांनी केले. सन २०२० ते २०२३ या तीन सालाकरिता नवीन कार्यकारी मंडळाची निवड सभासदांमधून करण्यात आली.
अध्यक्ष प्रा. बाचूळकर, उपाध्यक्ष गीता पोतदार, कार्यवाह - इराण्णा पाटील, सुभाष विभुते, सदस्य - सुधीर मुंज, संभाजी इंजल, विजय राजोपाध्ये, वामन सामंत, सदाशिव मोरे, रवींद्र हुक्केरी, महंमदअली मुजावर, डॉ. अंजनी देशपांडे, विद्या हरेर, सुचेता गड्डी यांची निवड करण्यात आली.
यावेळी झालेल्या चर्चेत अशोक चराटी, डॉ. अनिल देशपांडे, राजाभाऊ शिरगुप्पे, विलास नाईक, विजय बांदेकर, बंडोपंत चव्हाण, मारुती मोरे, अब्दुल नेसरीकर, डॉ. आर. पी. डिसोझा, सुरेश कातकर, शिवाजी पाटील यांनी भाग घेतला. विद्या हरेर यांनी आभार मानले.
--------------------------------
* अशोक बाचूळकर : १९०१२०२१-गड-०८