शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: भाजपमध्ये प्रवेश करताच स्वाती कोरी यांनी मंत्री मुश्रीफांवर आरोप केला; चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांना टोला लगावला, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:10 IST

गडहिंग्लजला माजी नगराध्यक्षा कोरींसह जनता दल कार्यकर्त्यांचा भाजपप्रवेश

गडहिंग्लज : विधान परिषदेला नगरसेवकांची २०-२२ मते असणाऱ्या जिल्ह्यातील तीन ठिकाणी सतेज पाटील यांना पाठिंबा मिळाला. त्यामुळेच अमल महाडिक यांनी निवडणुकीतून माघार घेतली. तीनपैकी स्वातीताई आमच्यात आल्या आहेत. आता ‘पेठवडगावच्या ताईंचं’ही बघा, अशी सूचना खासदार महाडिक यांना करत ‘स्वातीताई, गेल्या विधानपरिषद निवडणुकीवेळीच आमच्यासोबत आल्या असत्या, तर आता उड्या मारणारे सतेज पाटील आमदारच राहिले नसते,’ असा टोला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला.जनता दलाचे माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या माजी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, शहराध्यक्ष काशीनाथ देवगोंडा, माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.खासदार धनंजय महाडिक म्हणाले, श्रीपतराव शिंदेंनी केवळ जनतेच्या प्रेमावर साम्राज्य निर्माण केले. गोरगरिबांना न्याय देण्यासाठी प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष केला. आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, ‘आम्ही कुणाच्यात भांडण लावत नाही. कुणाचे घर उद्ध्वस्त करत नाही.’ यावेळी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, बाळासाहेब मोरे, महेश जाधव, राहुल चिक्कोडे, आदी उपस्थित होते.

शिवाभाऊंना थेट प्रवेशआमदार शिवाजीराव पाटील हे मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार आहेत. त्यांना देवाभाऊंकडे थेट प्रवेश असल्यामुळे स्वातीताईंनी चिंता करण्याचे कारण नाही. काहीवेळा मलाही शिवाजीरावांच्या मदतीनेच देवाभाऊंकडे जावे लागते, असा चिमटा मंत्री पाटील यांनी काढला.मुश्रीफांच्या दडपशाहीमुळेच भाजपमध्येमुश्रीफांनी मला व जनता दलाला राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दडपशाहीमुळे कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यामुळेच कोणत्याही अपेक्षेशिवाय विनाअट भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे स्वाती कोरी यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Swati Kori joins BJP, accuses Minister Mushrif; Patil taunts Satej.

Web Summary : Swati Kori joined BJP, accusing Minister Mushrif of suppression. Patil criticized Satej Patil, suggesting Kori's earlier support could have changed election results. Kori cited Mushrif's attempts to politically eliminate her and Janata Dal as the reason for joining BJP.