निवडणुकीची तयारी सुरू; कोल्हापूर हद्दवाढीचा विषय बारगळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:21 IST2025-06-11T12:21:07+5:302025-06-11T12:21:21+5:30

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी, अशी आग्रही मागणी होत असताना आणि याबाबत सरकार सकारात्मक विचारात ...

As preparations for the elections begin, the issue of Kolhapur boundary extension has become a hot topic | निवडणुकीची तयारी सुरू; कोल्हापूर हद्दवाढीचा विषय बारगळला

निवडणुकीची तयारी सुरू; कोल्हापूर हद्दवाढीचा विषय बारगळला

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी, अशी आग्रही मागणी होत असताना आणि याबाबत सरकार सकारात्मक विचारात असतानाच राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने महानगरपालिकेची चार सदस्यीय प्रभागरचना करण्याचे निर्देश मंगळवारी दिल्यामुळे ऐन टप्प्यावर कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विषय पुन्हा एकदा बारगळला. हद्दवाढ होणे आता अशक्य आहे.

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विषय सध्या जोरदार चर्चेत होता. स्थानिक पातळीवर होत असलेला आग्रह, खासदार शाहू छत्रपती यांनी यात लक्ष घालून पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची बैठक घेऊन त्यांची भूमिका विचारली होती. त्यावेळी सर्वांनी हद्दवाढीचे समर्थन केले होते. त्यामुळे या विषयाला थोडी गती मिळाली होती.

हद्दवाढीबाबत सर्वांना विश्वासात घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते; परंतु यातील कोणतीही गोष्ट साध्य झाली नाही.

सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले. त्यानुसार आयोगाने नगरविकास विभागाला पत्र पाठवून प्रभाग रचना तयार करण्याची सूचना दिली होती. यावर आज, नगरविकास विभागाने अ, ब, क, व ड महानगरपालिकांची प्रभागरचना तयार करण्याचा अध्यादेश काढला. त्यामुळे शहराच्या हद्दवाढीवर आता पडदा पडला आहे. हद्दवाढीचा विषय आणखी काही वर्षे रखडणार, हे स्पष्ट झाले.

Web Title: As preparations for the elections begin, the issue of Kolhapur boundary extension has become a hot topic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.