शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

गणेश आगमन, विसर्जन मिरवणुकीवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:29 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळला नसल्याने गणेशोत्सवात मिरवणुका काढण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे गणेश आगमनादिवशी आज, शुक्रवारी ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळला नसल्याने गणेशोत्सवात मिरवणुका काढण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे गणेश आगमनादिवशी आज, शुक्रवारी राजारामपुरीवर पोलिसांची विशेष करडी नजर राहणार आहे. शहरासह जिल्ह्यात सुमारे अडीच हजार पोलीस बंदोबस्त तैनात येणार आहे. रेल्वेस्थानक, बस स्टँन्डसह मंदिरांची बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.

कोरोना कमी झाला असला तरीही त्याचा धोका टळलेला नाही, त्यामुळे गणेशोत्सवात जिल्हा प्रशासनाने घालून दिलेले निर्बंध नागरिकांनी पाळावेत, गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. भाविकांसाठी थेट गणेश दर्शनाची सोय करण्याऐवजी ऑनलाइन दर्शनाची सोय करण्याचे आवाहन केले आहे. गणेशोत्सवाला आज, शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीवर प्रशासनाने बंदी घातली. त्यामुळे आगमनदिवशी दरवर्षी राजारामपुरीत गणेश मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असते. पण या मिरवणुकीवर बंदी घातल्याने राजारामपुरी परिसरात मिरवणुका निघणार नाहीत यासाठी पोलीस खात्याने दक्षता घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मिरवणुका काढल्यास कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

आज, शुक्रवारचा पोलीस बंदोबस्त

पोलीस कर्मचारी - २३३०

अधिकारी - १५१

होमगार्ड - १५१०

राज्य राखीव दल तुकड्या -०२