सीताफळांची आवक वाढली, पिवळ्याधमक पपईंनीही फुलला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 01:44 PM2021-07-19T13:44:58+5:302021-07-19T13:47:28+5:30

vegetable Fruits bajar kolhapur : बाजारात यंदा सीताफळांची लवकरच एंट्री झाली आहे. आवक कमी असल्याने दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात १८०० रुपये डझनापर्यंत दर पोहोचला आहे. त्याचबरोबर पिवळ्याधमक पपईने बाजार फुलला आहे. भाजीपाला मार्केटमध्ये आवक चांगली असल्याने दरात काहीशी घसरण झाली आहे.

The arrival of custard apple increased, the market also turned yellow papaya | सीताफळांची आवक वाढली, पिवळ्याधमक पपईंनीही फुलला बाजार

 कोल्हापुरातील फळबाजारामध्ये सीताफळांची आवक वाढली होती. (छाया- नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देसीताफळांची आवक वाढली, पिवळ्याधमक पपईंनीही फुलला बाजार भाजीपाल्याच्या दरात घसरण

कोल्हापूर : बाजारात यंदा सीताफळांची लवकरच एंट्री झाली आहे. आवक कमी असल्याने दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात १८०० रुपये डझनापर्यंत दर पोहोचला आहे. त्याचबरोबर पिवळ्याधमक पपईने बाजार फुलला आहे. भाजीपाला मार्केटमध्ये आवक चांगली असल्याने दरात काहीशी घसरण झाली आहे.

फळबाजारामध्ये पेरू, तोतापुरी आंबा, ड्रॅगन फळ, खजूर, डाळींब, सफरचंद, अननसाची रेलचेल सुरू आहे. सीताफळाची आवकही सुरू असून रविवारी बाजार समितीत सीताफळाचे ३९० ढीग होते. साधारणत: प्रतवारीनुसार २०० ते १८०० रुपये ढीग असा दर आहे. एका ढिगात एक डझन सीताफळे असतात.

भाजीपाला बाजारामध्ये भाज्यांची आवक वाढली आहे. पावसाने उघडीप दिल्याने आवक चांगली असली तरी दरात घसरण होऊ लागली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोबी, वांगी, ओली मिरची, ढब्बू, गवार, कारली, भेंडी, वरणा, वालच्या दरात घसरण झाली आहे.

वाटाण्याची आवकही चांगली आहे; त्यामुळे घाऊक बाजारात ७० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात १०० रुपये किलोपर्यंत दर आहे. टोमॅटो, घेवडा, दोडका, बिनीस, फ्लॉवरच्या दरात तुलनेत थोडी वाढ झालेली दिसते. कोथिंबिरीची आवक वाढली आहे.

बाजार समितीत रोज ४० हजार पेंढ्यांची आवक होत असल्याने तेवढा उठाव होत नाही. परिणामी घाऊक बाजारात शेकडा ६०० रुपये दर राहिला आहे. मक्याच्या कणसांची आवक वाढली असून ६०० रुपये शेकडा दर आहे, मात्र किरकोळ बाजारात कणसाचा दर दहा रुपये आहे.

पालेभाज्यांची आवक स्थिर आहे. कांदापात दहा रुपये, तर मेथी पंधरा रुपये पेंढी आहे. पालक, पोकळा मात्र सात रुपयांवर स्थिर राहिला आहे. महाराष्ट्रीय बेंदूर तोंडावर आल्याने सरकी तेलाच्या दरात पुन्हा हळूहळू वाढ होऊ लागली आहे. सध्या १५० रुपये किलो असले तरी घाऊक बाजारात मात्र किलोमागे तीन-चार रुपयांची वाढ दिसते. डाळींसह साखर, रवा, आटा, मैद्याचे दर स्थिर आहेत.

किरकोळ बाजारातील दर प्रतिकिलो असे -

तूरडाळ - ११०, हरभराडाळ - ७०, मूगडाळ - ११०, मूग -१००, शाबू - ६०, साखर - ३५, रवा - ३५, आटा - ३०, मैदा - ३०, खोबरे - १८०.
 

Web Title: The arrival of custard apple increased, the market also turned yellow papaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.