कसबा बीडच्या ठिय्या आंदोलतील प्रमुख मुकुंद पाटील यांची तब्बेत खालावल्यामुुळे खाजगी रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 17:43 IST2020-02-01T17:42:28+5:302020-02-01T17:43:29+5:30
दरम्यान कसबा बीड गावातील शेतकरी यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.व हे आंदोलन असेच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुकुंद पाटील यांना दोन दिवसापासुन ताप आल्याने ते आजारी पडले आहेत

कसबा बीडच्या ठिय्या आंदोलतील प्रमुख मुकुंद पाटील यांची तब्बेत खालावल्यामुुळे खाजगी रुग्णालयात
सावरवाडी : शेतकऱ्याना शेतकरी कर्जमाफी मिळाली पाहिजे, सात बारा कोरा करा या मागण्यासाठी कसबा बीड ( ता .करवीर ) येथे गेली सहा दिवस सुरू ठिय्या आंदोलन सुरू आहे . मात्र आंदोलनकर्ते मुकुंद भगवान पाटील ( कसबा बीड ), ता- करवीर, यांची तब्बेत खालवल्यामुळे त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
दरम्यान कसबा बीड गावातील शेतकरी यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.व हे आंदोलन असेच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुकुंद पाटील यांना दोन दिवसापासुन ताप आल्याने ते आजारी पडले आहेत . त्यांच्यावर कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत . दरम्यान कसबा बीड ग्रामस्थ, शेतकरी यांनी ठिय्या आंदोलनाचा लढा सुरू राहणार असल्याचे सांगितले .