शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विशाळगड जाळपोळ प्रकरण: दंगलखोरांना सोडले, मग पत्रकारांना का अडवता..? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 12:53 IST

गजापूरला जाण्यास विरोध : तासभर अडवल्याने पोलिसांशी वाद

कोल्हापूर : शनिवार-रविवार दोन दिवस दंगलखोर विशाळगडावर जात होते तेव्हा त्यांना कुणीच अडवले नाही आणि आता पत्रकार दंगलग्रस्त लोकांना भेटायला जात असताना तुम्ही का अडवता, अशी संतप्त विचारणा कोल्हापुरातील सर्वच माध्यम प्रतिनिधींनी मंगळवारी पोलिस व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना केली. पांढरेपाणी येथे दुपारी त्यावरून सुमारे तासभर वाद झाला. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर पोलिसांच्या तीनच गाड्या गजापूरकडे सोडण्यात आल्या.दुपारी १२ वाजेच्या सुमारास इंडिया आघाडीचे नेते पांढरेपाणी येथे आल्यानंतर त्यांना पोलिसांनी अडवले. शाहूवाडीचे प्रांत समीर शिंगटे, पोलिस निरीक्षक विजय घेरडे, स्वाती गायकवाड यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तिथे होता. प्रकरण संवेदनशील आहे आणि १४४ कलम लागू केल्याने तुम्हाला वर जाता येणार नाही, असे प्रांत शिंगटे यांनी सांगितले. त्यावर शाहू छत्रपतींनी मग दंगलखोर कसे गेले, रविवारी तुम्ही कुणाला असे अडवले होते का, अशी विचारणा केल्यावर ते निरुत्तर झाले. आम्ही लोकांशी संवाद साधायला निघालो आहे आणि जाणारच आहे, असे निक्षून सांगितले. आमदार सतेज पाटील यांनी तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून घ्या असे सुचवले. त्यानंतर प्रांत शिंगटे यांनी फोनवरून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी फक्त ५ लोकांनाच जाता येईल सांगितले. चर्चेतून १५ निवडक लोकांना जाण्याची परवानगी दिली. परंतु पत्रकारांना आम्ही सोडणार नाही..आम्हाला तसे वरून आदेश आहेत, असे सांगण्यात आले. परंतु हे ऐकायला पत्रकार तयार नव्हते. दंगलखोरांनी आमच्या पोटाला चाकू लावला तेव्हा तुम्ही कुठे होता.. घटनेचे व्हिडीओ साऱ्या देशभर व्हायरल झाले आणि आता आम्हाला का अडवता.. तुम्ही कसे अडवता ते अडवा म्हणून पत्रकार बॅरिकेड तोडून घुसले. त्यांना पोलिस अडवत होते. ही बाब इंडिया आघाडीच्या नेत्यांना समजल्यावर तुम्ही पत्रकारांना सोडणार नसाल तर आम्ही जाणार नाही, असा पवित्रा आर. के. पोवार, मेघा पानसरे, भारती पोवार, गिरीश फोंडे, सतीश कांबळे आदींनी घेतला. उदय नारकर यांनीही पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. तरीही पोलिस ऐकायला तयार नव्हते. मग प्रांत शिंगटे पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांशी बोलले. त्यांनी तीनच वाहने सोडणार अशी परवानगी दिली मग तासभर हुुज्जत घातल्यानंतर पत्रकारांना फक्त १५ मिनिटांत खाली निघून यायचे असे सांगत गजापूरकडे सोडण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसJournalistपत्रकार