दोेन कुटूंबियाच्या वादात मध्यस्थाचाच निघृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 18:33 IST2021-01-07T18:31:57+5:302021-01-07T18:33:39+5:30
Murder Crimenews police kolhapur- दोन कुटुंबांच्या वादात मध्यस्ती करणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वर्मी घाव घालून निघृण खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री उशिरा फुुलेवाडी रिंगरोडवर नाना पाटील नगरशेजारील वासुदेव कॉलनीत बॉलच्या कारखान्यानजीक घडली.

खून झालेल्या आकाश वांजोळे याच्या निवासस्थानी मित्र, नातेवाईकांची गर्दी
कोल्हापूर : दोन कुटुंबांच्या वादात मध्यस्ती करणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वर्मी घाव घालून निघृण खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री उशिरा फुुलेवाडी रिंगरोडवर नाना पाटील नगरशेजारील वासुदेव कॉलनीत बॉलच्या कारखान्यानजीक घडली.
आकाश आनंदराव वांजोळे (वय २८ रा. वासुदेव कॉलनी, नाना पाटील नगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा दुसरा साथीदार दत्तात्रय तम्मा फोंडे (३० रा. वासुदेव कॉलनी) हा जखमी झाला आहे. जेवणातील खरकटे पदार्थ घरासमोरील गटारात टाकण्यावरुन काही महिने कचरे व फोंडे कुटुंबात वाद होता, त्याचे पर्यावसान मध्यस्थाच्या खुनात झाले. या घटनेमुळे संपूर्ण नाना पाटील नगरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी भारत दिलीप कचरे (वय ३२) त्याचा भाऊ मारुती कचरे (३४), सुरेश कचरे (२९, सर्व रा. वासुदेवनगर) हे किरकोळ जखमी झाल्याने तेही उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांना करवीर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली.