शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दुसरे डिव्हिजन बेंच सोमवार ते बुधवार चालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:52 IST

न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले, न्यायमूर्ती वृषाली जोशी यांची नवीन बेंचसाठी नियुक्ती झाली

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आणखी एक डिव्हिजन बेंचला मंजुरी मिळाली आहे. येत्या बुधवारपासून त्याचे कामकाज चालणार आहे. दुसरे डिव्हिजन बेंच केवळ सोमवार ते बुधवार चालणार आहे. यामध्ये सन २०२० पर्यंतच्या दिवाणी याचिका, २०२१ पर्यंतच्या फौजदारी याचिका, आणि सन २०१० पर्यंतच्या फौजदारी अपिलांचे कामकाज चालणार आहे.कोल्हापुरात ऑगस्ट २०२५ मध्ये सर्किट बेंचची स्थापना झाली. त्यानंतर एक डिव्हिजन बेंच आणि अन्य दोन स्वतंत्र न्यायमूर्ती अशी चार संख्या होती. आता नवीन एक डिव्हिजन बेंच होणार आहे. न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले, न्यायमूर्ती वृषाली जोशी यांची नवीन बेंचसाठी नियुक्ती झाली आहे. सर्किट बेंचच्या तिसऱ्या मजल्यावरील रूमनंबर पाचमध्ये या बेंचचे कामकाज चालणार आहे.न्यायमूर्ती जोशी यांच्या सिंगल बेंचचे कामकाज गुरूवार ते शुक्रवारपर्यंत चालणार आहे.त्यांच्याकडे २०१८ पर्यंतच्या दिवाणी याचिका, सन २०१८ पर्यंतच्या सेंकड अपील, सन २०१० पर्यंतचे फौजदारी अपीलचे कामकाज चालणार आहे. न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या सिंगल बेंचचे कामकाज गुरुवार आणि शुक्रवारी चालणार आहे. यांच्याकडे फौजदारी याचिका, अटकपूर्व जामीन अर्ज, एफआयआर रद्द करणे, दोषारोपपत्र, गुन्ह्याची दखल घेण्यासंबंधी कामकाज चालणार आहे.डिव्हिजन बेंच एकमध्ये न्यायमूर्ती माधव जामदार, न्यायमूर्ती प्रवीण पाटील आहेत. यांच्याकडे सर्व जनहित याचिका २०२१ पासूनचे दिवाणी अपील, फस्ट अपील, कौटुंबिक न्यायालय अपील, कर कायदा, त्यांचे अपील, पेटंट अपील आदी प्रकरणांची अपिले चालणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Circuit Bench to have second division bench thrice weekly.

Web Summary : Kolhapur Circuit Bench gets a second division bench operating Monday-Wednesday. It will handle civil petitions (2020), criminal petitions (2021), and criminal appeals (2010). Justice Bhosale and Joshi are appointed. Existing benches continue with assigned cases and schedules.