शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-Gokul Dudh Sangh: ‘गोकुळ’वर प्रशासक नियुक्ती शक्य

By राजाराम लोंढे | Updated: April 1, 2026 15:57 IST

विधेयक दुरुस्तीचा परिणाम : निवडणूक लटकली प्राधिकरणाच्या मार्गदर्शनावर

राजाराम लोंढेकोल्हापूर : ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाची मुदत १४ मे २०२६ रोजी संपत आहे. त्यानंतर तातडीने प्रशासक आणण्याच्या हालचाली राज्य शासनाच्या पातळीवर सुरू आहेत. एक लाख लिटर पेक्षा अधिक दूध संकलन असणाऱ्या सहकारी दूध संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर प्रशासक नियुक्ती करावी, असे विधेयक दुरुस्ती अर्थसंकल्पीय अधिवेशनात करून घेतल्याने सत्तारूढ गटासमोरील अडचणी वाढणार, हे निश्चित आहे.दुग्ध विभाग ‘गोकुळ’च्या संलग्न संस्था प्रतिनिधीच्या नावाचे ठराव मागवण्याची प्रक्रिया ९ मार्चपासून सुरू करणार होते; पण संघाने सादर केलेल्या ५४७० सभासद यादीपैकी ११०८ संस्थांवर अवसायनाचे मध्यंतरी आदेशाची टांगती तलवार होती. न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर त्याच्या सुनावणीची प्रक्रिया सुरू झाली; पण यासाठी किमान महिन्याचा कालावधी जाणार आहे. तेथून पुढे ठराव मागवून अंतिम यादी तयार करण्यास किमान दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत १४ मे रोजी संचालक मंडळाची मुदत संपत आहे.विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांनी ठराव मागवण्यासाठीचा सुधारित कार्यक्रम मंजुरीसाठी पाठवण्याचे आदेश दिले असले तरी ‘त्या’ ११०८ संस्थांचे काय करायचे? याबाबत सहायक निबंधक (दुग्ध) यांनी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) व निवडणूक प्राधिकरणाकडे मार्गदर्शन मागवले आहे.पूर्वी संबंधित संस्थेने निवडणूक घेण्यास टाळाटाळ केली किंवा तिथे अपहार झाला तरच प्रशासक नियुक्तीचे शासनाला अधिकार होते; पण परवा झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खास विधेयक आणले गेले. एक लाखापेक्षा अधिक दूध संकलन असणाऱ्या संस्थांच्या संचालकांची मुदत संपल्यानंतर तातडीने प्रशासक नियुक्ती करणे, हे विधेयक मंजूर झाल्याने विद्यमान संचालकांसमोरील अडचणी वाढणार आहेत.

निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी यंत्रणा सक्रिय‘गोकुळ’ची निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी एक यंत्रणा सक्रिय आहे. त्या यंत्रणेला १४ मे पूर्वी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होऊ द्यायची नाही. तर सत्तारूढ गटाला तत्पूर्वी प्रक्रिया सुरू करायची आहे.

न्यायालयीन लढाई पुन्हा सुरू होण्याची शक्यताप्रशासक नियुक्त्याच्या हालचाली सुरू असल्याचे सत्तारूढ गटाच्या लक्षात आले आहे. प्रशासक नियुक्तीला पोषक घटना टाळण्याचा प्रयत्न सत्तारूढ करत आहे. त्यातून नियु्क्ती झाली तर पुन्हा न्यायालयीन लढाई सुरू होण्याची शक्यता आहे.

सहा संस्था सभासद अगोदर नंतर नोंदणी?दुग्ध विभागाने नोंदणी प्रमाणपत्र दिल्यानंतर ‘गोकुळ’ने त्यांना सभासदत्व द्यायचे असते. मात्र, ‘गोकुळ’ने दिलेल्या यादीत सहा दूध संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र मिळण्याअगोदरच संघाने सभासदत्व दिल्याची तक्रार विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांच्याकडे दाखल झाल्याचे समजते. यामध्ये शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी तालुक्यांतील प्रत्येकी एक तर कागल तालुक्यातील तीन संस्थांचा समावेश असल्याचे समजते.

English
हिंदी सारांश
Web Title : Administrator appointment likely for Kolhapur-Gokul Dudh Sangh after term ends.

Web Summary : After Gokul Sangh's term ends May 14, 2026, administrator appointment is probable. Amendment in assembly allows appointment after term, increasing ruling party's challenges. Election postponement efforts are on; court battle possible.