राहूल पाटील, अमल महाडिक, राहुल आवाडे, नवीद मुश्रीफ यांनी नेले अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 12:07 IST2021-03-26T12:04:49+5:302021-03-26T12:07:05+5:30
Gokul Milk Elecation kolhapur- गोकूळ निवडणुकीसाठी अर्ज नेण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल ७६ जणांनी २६० अर्ज नेले तर ७ जणांनी ते लगेच दाखलही केले. यात नेहमीप्रमाणे बडे नेते व त्यांच्या वारसदारांचा भरणा दिसत आहे. महादेवराव महाडीक यांचा मुलगा अमल , आमदार पी.एन. पाटील मुलगा राहूल , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा नविद, आमदार प्रकाश आवाडे यांचा मुुलगा राहूल यांचा अर्ज नेणाऱ्यांत प्रामुख्याने समावेश आहे.

राहूल पाटील, अमल महाडिक, राहुल आवाडे, नवीद मुश्रीफ यांनी नेले अर्ज
कोल्हापूर : गोकूळ निवडणुकीसाठी अर्ज नेण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल ७६ जणांनी २६० अर्ज नेले तर ७ जणांनी ते लगेच दाखलही केले. यात नेहमीप्रमाणे बडे नेते व त्यांच्या वारसदारांचा भरणा दिसत आहे. महादेवराव महाडीक यांचा मुलगा अमल , आमदार पी.एन. पाटील मुलगा राहूल , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा नविद, आमदार प्रकाश आवाडे यांचा मुुलगा राहूल यांचा अर्ज नेणाऱ्यांत प्रामुख्याने समावेश आहे.
गोकूळ दूध संघाचे संचालकपद हे आमदारकीच्या तोलामोलाचे मानले जात असल्याने हे पद मिळावे यासाठी बरेच जण देव पाण्यात घालून बसतात. पण कांही घराण्यांच्या मक्तेदारीमुळे येथे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा शिरकाव करणे तसे महाकठीण असते. ही निवडणूक गटातंर्गत इर्ष्येंने आणि अंतर्गत खेळ्यांवर आधारीत लढवली जात असल्याने यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा टिका लागणेही तसे अशक्यच असते, त्यामुळे यंत्रणा हाताळण्यासाठी म्हणून बडे मातब्बर नेते व त्यांच्या वारसदारांचीच नावे पुढे केली जातात.
यातूनच गोकूळची फळे चाखणारी म्हणून स्वतंत्र घराणीच जिल्ह्यात तयार झालेली दिसतात. यावर्षीची निवडणुकही याला अपवाद नाही. सत्ताधारी व विरोधी आघाडीही तुल्यबळ असल्यामुळे यावेळची निवडणुक सोपी राहिलेली नसल्यामुळे प्रत्येक नेत्यांनी वारसदारांचे पत्ते बाहेर काढले आहेत.
संचालक रामराजे कुपेकर यांच्यासह शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिणचेकर, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही आम्ही तर मागे का राहू असे म्हणून उमेदवारी अर्ज नेले आहेत.
शेवटी पालखीचे भोईच
नेते व त्यांच्या वारसदारांचे अर्ज नेण्यासाठी मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज करवीर प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात सर्व सोपस्कार पूर्ण करण्यासाठी राबताना दिसत होती. नेते अर्ज भरत असताना कार्यकर्ते त्यांच्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त होते. त्यामुळे कार्यकर्ते किती निष्ठावंत असलेतरी ते पालखीचे भोईच असतात, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.