शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २८ तर 'हातकणंगले'त ३६ जणांचे अर्ज, सोमवारी माघारीची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 4:52 PM

शेवटच्या दिवशी २९ उमेदवारांनी भरला अर्ज : सोमवारी माघारीची मुदत

कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोल्हापूरहातकणंगले लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही मतदारसंघातील २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकूण २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेवटच्या दिवसापर्यंत ३६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला.

आज शनिवारी अर्जांची छाननी होणार असून सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. माघारीनंतरच दोन्ही मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १६ जणांनी अर्ज दाखल केले.

छाननी आज..कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची आज शनिवारी छाननी होणार आहे. छाननीत किती अर्ज राहतात, कुणाचे अर्ज वैध, अवैध ठरतात याकडे सर्वच पक्षांंसह कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.

माघारीसाठी फिल्डिंग..उमेदवारांना सोमवारी (दि. २२) दुपारी तीन वाजेपर्यंत आपला अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. दोन्ही मतदारसंघात अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यात काही उमेदवार हे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या व्होट बँकेला धक्का पोहचवू शकतात. त्यामुळे अशा बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांची कसोटी लागणार आहे. गत निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून १५ व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात १७ उमेदवार रिंगणात होते.

कोल्हापूर लोकसभाउमेदवार २८, नामनिर्देशनपत्र -४२हातकणंगलेउमेदवार- ३६, नामनिर्देशनपत्र -५५

कोल्हापुरात शेवटच्या दिवशी १३ जणांचे अर्जकोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी १३ उमेदवारांनी १४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. यामध्ये अरविंद भिवा माने (भारतीय राष्ट्रीय दल), संजय भिकाजी मागाडे (बहुजन समाज पार्टी) व अपक्ष म्हणून मुश्ताक अजीज मुल्ला, बाजीराव नानासो खाडे, माधुरी राजू जाधव, ॲड. यश सुहास हेडगे-पाटील, कृष्णाबाई दीपक चौगले, मालोजीराजे छत्रपती, सुभाष वैजू देसाई, इरफान आबुतालिब चांद, राजेंद्र बाळासो कोळी, मंगेश जयसिंग पाटील, कुदरतुल्ला आदम लतीफ यांचा समावेश आहे.

हातकणंगलेत १६ जणांचे अर्जहातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी १६ उमेदवारांनी २२ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. यात महम्मद मुबारक दरवेशी, बहुजन समाज पार्टीकडून रवींद्र तुकाराम कांबळे, स्वाभिमानीकडून राजू ऊर्फ देवापान्ना शेट्टी, कामगार किसान पार्टीचे संतोष केरबा खोत, अपक्ष म्हणून सत्यजीत बाळासो पाटील, अरविंद भिवा माने, राजेंद्र भीमराव माने, धैर्यशील संभाजी माने, अस्लम ऐनोद्दीन मुल्ला, लक्ष्मण शिवाजी तांदळे, विश्वास आनंदा कांबळे, वेदांतिका धैर्यशील माने, परशुराम तमन्ना माने, अस्मिता सर्जेराव देशमुख, शरद बाबुराव पाटील, जावेद सिकंदर मुजावर, सुनील विलास अपराध, आनंदराव वसंतराव सरनाईक, दिनकरराव तुळशीदास चव्हाण, श्रीमती गोविंदा डवरी यांचा समावेश आहे.

कोल्हापूर मतदारसंघातील प्रमुख उमेदवार

  • संजय मंडलिक-महायुती
  • शाहू छत्रपती -महाविकास आघाडी

हातकणंगले मतदारसंघातील प्रमुख उमेदवार

  • धैर्यशील माने -महायुती
  • राजू शेट्टी -स्वाभिमानी शेतकरी संघटना
  • सत्यजित पाटील-सरुडकर-महाविकास आघाडी
  • डी.सी.पाटील-वंचित बहुजन आघाडी
  • रघुनाथ पाटील -भारतीय जवान किसान पार्टी
टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीsanjay mandlikसंजय मंडलिकdhairyasheel maneधैर्यशील मानेSatyajit Patilसत्यजित पाटीलRaju Shettyराजू शेट्टी