शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

बेळगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावे आणखी एका मार्गाचे नामकरण, सीमावासियांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 16:09 IST

'बेळगाव शहरातील रस्त्यांना नावे देऊन शहराचं कानडीकरण करण्याचा घाट'

प्रकाश बेळगोजी बेळगाव: बेळगावमधील अनगोळ परिसरातील बेम्को हायड्रॉलिक्स ते चौथ्या रेल्वे गेटपर्यंतच्या मार्गाचे नाव बसवराज बोम्मई मार्ग असे करण्यात आले. आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या नामफलकाचे अनावरण पार पडले. के. एल. इ. संस्थेच्या डॉ. शेषगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नगरविकास मंत्री भैरती बसवराज यांनी ‘बसवराज बोम्मई मार्ग’ या नामफलकाचे अनावरण केले. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेल्या रस्त्याचे नामकरण करण्याबरोबरच डेकोरेटिव्ह पथदीपांचे उद्घाटनही मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे नाव देऊन नामकरण करण्यात आलेला बेळगावमधील हा दुसरा मार्ग आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचेही नाव बेळगावमधील जुन्या पी बी रोड वरील रस्त्याला देण्यात आले आहे. जुने बेळगाव ते अलारवाड क्रॉस या रस्त्याला दहा वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा मार्ग असे नामकरण करण्यात आले होते. आता उद्यमबाग मधल्या या रस्त्याला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे नाव देण्यात आलेले आहे.कर्नाटक सरकारच्या विविध लोकप्रतिनिधींची बेळगाव शहरातील रस्त्यांना नावे देऊन बेळगाव शहराचं कानडीकरण करण्याचा घाटच कर्नाटक सरकारने या निमित्ताने घातला आहे असा आरोप होऊ लागला आहे. मराठी माणसांची ओळख पुसणे आणि कानडी ओळख निर्माण करणे हा यामागचा हेतू आहे अशी नाराजी सीमावासीय व्यक्त करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर