चप्पल फेकल्याचा राग अन् लाथाबुक्क्यांनी मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST2021-09-23T04:26:39+5:302021-09-23T04:26:39+5:30

कोल्हापूर : दारातील चप्पल फेकल्याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्याच्या रागापोटी संतप्त शेजाऱ्याने घरात घुसून एकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, माझ्या ...

Anger of throwing slippers is beaten by Anlathabukka | चप्पल फेकल्याचा राग अन् लाथाबुक्क्यांनी मारहाण

चप्पल फेकल्याचा राग अन् लाथाबुक्क्यांनी मारहाण

कोल्हापूर : दारातील चप्पल फेकल्याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्याच्या रागापोटी संतप्त शेजाऱ्याने घरात घुसून एकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, माझ्या विरोधात तक्रार दिलीस, तुला सोडतच नाही, अशी धमकी दिली. याबाबत येथील जुनी मोरे कॉलनीत घडलेल्या प्रकरणाची तक्रार जखमी नितीन परशुराम जाधव (रा.इरा पार्क, जुनी मोरे कॉलनी) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार, जयदीप प्रमोद पाटणे (रा.इरा पार्क अपार्टमेंट) याच्यावर गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी जाधव व संशयित आरोपी पाटणे हे दोघे एकाच इरा अपार्टमेंटमध्ये शेजारी राहतात. रविवारी (दि.१९) रात्री नितीन जाधव याने आपल्या फ्लॅटच्या दारातील चप्पल फेकल्याचा गैरसमज करून, संशयित आरोपी पाटणे याने त्याला फ्लॅटच्या बाहेर बोलवून अचानक गळपट्टी धरून मारहाण व शिवीगाळ केली. त्याबाबत जाधव याने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्याचा राग मनात धरून, संशयित पाटणे याने मंगळवारी त्यांच्या घरात घुसून मुख्य दरवाजाला आतून कडी लावून जाधव यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, तसेच तू माझ्याविरोधात तक्रार का दिलीस, असा जाब विचारून, तुला सोडणार नसल्याची धमकी दिली, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत तक्रारीनुसार संशयित जयदीप पाटणे यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे.

Web Title: Anger of throwing slippers is beaten by Anlathabukka