गडहिंग्लजमध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांचा 'माझे कुटुंब'वर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 05:58 PM2020-09-21T17:58:58+5:302020-09-21T18:01:20+5:30

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी 'या मोहिमेवर गडहिंग्लज तालुक्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांनी आज, सोमवारपासून (२१) बहिष्कार टाकला.

Anganwadi workers boycott 'My Family' in Gadhinglaj | गडहिंग्लजमध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांचा 'माझे कुटुंब'वर बहिष्कार

गडहिंग्लज येथे तहसीलदार दिनेश पारगे यांना अंगणवाडी कर्मचारी सभेतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी अंजना शारबिद्रे, राजश्री बाबण्णावर, सुरेखा गायकवाड, भारती कुंभार, मालू केसरकर, सोना पाटील, सुवर्णा राऊत आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देगडहिंग्लजमध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांचा 'माझे कुटुंब'वर बहिष्कारअतिरिक्त जबाबदारी नको : तहसीलदार, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन

गडहिंग्लज : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी 'या मोहिमेवर गडहिंग्लज तालुक्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांनी आज, सोमवारपासून (२१) बहिष्कार टाकला.

तहसीलदार दिनेश पारगे व पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांना शिष्टमंडळाने भेटून निवेदन देण्यात आले आहे. अतिरिक्त कामाच्या जबाबदारीतून अंगणवाडी कर्मचार्‍यांना वगळावे अशी मागणी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे, कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यापासून अंगणवाडीची कुपोषणमुक्ती, पुर्व प्राथमिक शिक्षण व सर्वांगीण बालविकास आदी कामे ठप्प झाली आहेत. परंतु, आहार वाटप, लसीकरण, गृहभेटी, पोषण महिना, मुलांना व पालकांना मार्गदर्शन,बालकांची आरोग्य तपासणी आदी नियमित कामे करावी लागत आहे.त्यामुळे मोहिमेतील अतिरिक्त काम नको, अशी मागणी करण्यात आली.

शिष्टमंडळात अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य संघटक बाळेश नाईक, जिल्हाध्यक्षा अंजना शारबिद्रे, राजश्री बाबण्णावर, सुरेखा गायकवाड, भारती कुंभार, मालू केसरकर, सोना पाटील, सुवर्णा राऊत आदींचा समावेश होता.

 

Web Title: Anganwadi workers boycott 'My Family' in Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.