शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

अमेरिकन लष्करी अळीचा धुमाकूळ, कोल्हापूर  जिल्ह्यात १६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 18:19 IST

यावर्षी विचित्र हवामान परिस्थितीमुळे शेती आतबट्ट्यात असतानाच आता अमेरिकन लष्करी अळीने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मका, ज्वारी, ऊस या पिकांचा ही अळी फडशा पाडत आहे. पूर्णपणे पाने खात असल्याने पिकांच्या नुकसानीचे प्रमाण ७० टक्क्यांच्याही वर आहे.

ठळक मुद्देअमेरिकन लष्करी अळीचा धुमाकूळ, कोल्हापूर  जिल्ह्यात १६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसानकरवीर, पन्हाळा, कागल तालुक्यांत जास्त प्रादुर्भाव, शेतकऱ्यांची चिंता वाढली

कोल्हापूर : यावर्षी विचित्र हवामान परिस्थितीमुळे शेती आतबट्ट्यात असतानाच आता अमेरिकन लष्करी अळीने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मका, ज्वारी, ऊस या पिकांचा ही अळी फडशा पाडत आहे. पूर्णपणे पाने खात असल्याने पिकांच्या नुकसानीचे प्रमाण ७० टक्क्यांच्याही वर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे या अळीने नुकसान केले आहे.कोल्हापूर जिल्ह्यात या वर्षी अतिपावसामुळे पिकांवरील कीड रोगांचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत जास्त आहे. जास्त पाऊस आणि कमी सूर्यप्रकाशामुळे या अळ्यांचे प्रमाण वाढले. यात हुमणी, लोकरी मावा, तुडतुडे, गोगलगाय, सुरवंटासह पावसाळ्यातील किड्यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. यात पाने खाणाऱ्या लष्करी अळीचाही समावेश होता. या वर्षी तर सलग पावसामुळे या अळीकडून होणाऱ्या नुकसानीच्या प्रमाणात वाढच झाली.

आता या अळीमध्ये अमेरिकन लष्करी अळीची नव्याने भर पडली आहे. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील अतिपावसाच्या तालुक्यामध्ये अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाने केलेल्या पाहणीत आढळले आहे. विशेषत: कागल, करवीर, पन्हाळा या तीन तालुक्यांत या अळीने मका, ज्वारी, उसावर आक्रमण करून फडशा पाडल्याचे दिसत आहे. गडहिंग्लज, आजरा, चंदगड या ठिकाणीही या अळीने पिकांचे नुकसान केले आहे.ही अळी मुख्यत्वे मका पिकावर जास्त वाढते. पूर्ण पाने खाऊन ती बोंग्यातही शिरते. पाने कुरतडल्याने त्यांची जाळी तयार होउन पिकाची वाढ खुंटते. मका आणि ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या या अळीने आता नव्याने लागण झालेल्या उसाकडे मोर्चा वळविला आहे. ही अळी उसाच्या पानांचा फडशा पाडत आहे. आडसाली, पूर्वहंगामी लागणीमध्ये याचा प्रादुर्भाव दिसत आहे. आधीच लोकरी मावा आणि हुमणीमुळे ऊसपीक अडचणीत असताना, आता या अळीच्या प्रसारामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.

जिल्ह्यातील बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)करवीर (५५), कागल (५४), पन्हाळा (४०), गडहिंग्लज( १०), आजरा (०५), चंदगड (०४).

असे करा नियंत्रणकृषी सहायकांच्या मदतीने तातडीने यावर उपाययोजना सुचविल्या जात आहेत. कामगंध सापळ्याबरोबरच एकात्मिक किडी व्यवस्थापनसह क्लोरोअ‍ॅट्रानिलीप्रोल १८.५ एस.सी. अथवा नोमुरिया रिलेयी ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून मिसळून फवारणी केल्यास या किडीचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. तसेच या अळीचा प्रसार रोखण्यासाठी म्हणून या अळीचे नर पतंग पकडणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी फेरोमोन सापळे शेतात लावण्याविषयी कृषी विभागाकडून प्रात्यक्षिके दाखविली जात आहेत. 

या अळीच्या डोक्यावर उलटा ‘वाय’ आकाराचे चिन्ह दिसते आणि तिच्या शेवटच्या भागावर काळ्या रंगाचे चार ठिपके असतात. या वैशिष्ट्यावरून ही अळी ओळखता येते. या अळीची वाढ पूर्ण होण्यासाठी १५ ते १६ दिवस लागतात. पूर्ण वाढलेली अळी जमिनीत कोषावस्थेत जाते आणि सात ते आठ दिवसांतून त्यातून पतंग बाहेर पडतो. या किडीचा जीवनक्रम २५ ते ३० दिवसांत पूर्ण होतो. या पतंग आणि मादीच्या मिलनातून पुन्हा अंडीपुंज तयार होऊन एका पुंजातून सात ते आठ अळ्या तयार होतात. अशा प्रकारे या अळ्यांचा प्रसार वाढत जातो. त्यामुळे या धोकादायक अळीचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.पांडुरंग मोहिते, कीटकशास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर