शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली गर्दीने फुलली

By admin | Updated: July 27, 2015 00:27 IST

धबधबे ओसंडले : वाहतूक कोंडी; हजारो पर्यटकांची हजेरी

आंबोली : जोरदार पावसाने आंबोलीतील सर्व धबधबे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे रविवारी आंबोलीचे वर्षा पर्यटन हाऊसफुल्ल झाले होते. धबधब्यावर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. रविवारी आंबोलीत दिवसभरात सुमारे ३० ते ३५ हजार पर्यटकांनी हजेरी लावली होती. आंबोलीत तीनही सत्रात वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत ही कोंडी दूर केली.आंबोलीत मुसळधार पाऊस कोसळत असून, सर्व धबधबे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे गोवा, कर्नाटक तसेच सिंधुदुर्गमधील पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. सकाळपासून आंबोली पर्यटकांनी फुलून गेली होती. जिकडे तिकडे वाहने व पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत होती. त्यामुळेही गर्दीला आवर घालत असताना पोलिसांनाही किरकोळ लाठीचा वापर करावा लागत होता. मुख्य धबधब्यानजीक पोलीस योग्य पद्धतीने बंदोबस्त हाकत असतानाच इतर ठिकाणी मात्र गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना अपयश येत होते. अनेक ठिकाणी तर केवळ दोन वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी दूर करीत होते. स्टॉलधारकांनी पर्यटकांसाठीच्या पार्किंगस्थळावर वाहने उभी केल्याने पर्यटकांना अडथळे निर्माण होत होते. दरम्यान, मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. उशिरापर्यंत थांबणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी चांगलाच मज्जाव केला होता. (वार्ताहर) (छायाचित्र पान ३ वर)सावडाव धबधब्यावर बाचाबाचीकणकवलीनजीक सावडाव धबधब्यावरही रविवारी गर्दी झाली होती. पाऊस चांगला झाल्याने धबधबा पाण्याने ओसंडून वाहत आहे. मात्र, येथे वादावादीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. रविवारी कुडाळ आणि कणकवली येथील युवकांच्या दोन गटांत बाचाबाचीचा प्रसंग उद्भवला, परंतु त्यातीलच काहींनी मध्यस्थी करत यावर पडदा टाकला. येथे सुटीच्या दिवशीही पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी होत आहे.