शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या माळेला अंबाबाई गजलक्ष्मी रूपात

By admin | Updated: October 16, 2015 23:10 IST

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक देवता असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाईची गजलक्ष्मीच्या रूपात पूजा

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या माळेला साडेतीन शक्तिपीठांपैकी एक देवता असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाईची गजलक्ष्मीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. तुळजाभवानी देवीची अन्नपूर्णा फलाहार रूपात पूजा बांधण्यात आली. शुक्रवार म्हणजे शक्तीच्या उपासनेचा वार; त्यामुळे अंबाबाई मंदिरात पहाटेपासून भाविकांच्या लांबच लांब दर्शनरांगा लागल्या होत्या. सकाळी निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक माधवराव सानप यांच्या हस्ते अंबाबाईला शासकीय अभिषेक झाला. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे उपस्थित होते. त्यानंतर देवीची गजलक्ष्मीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. ‘सकल सौभाग्यकारिण्यै श्रीगजलक्ष्म्यै नम: । गजलक्ष्मि नमस्ते स्तु सर्वदेवस्वरूपिणी अश्र्वांश्च गोकुलं देहि सर्वकमांश्च देहि मे।।’ अष्टलक्ष्मींतील चौथी देवता श्री गजलक्ष्मी ही समुद्रमंथनातून उत्पन्न झाली. ही दुर्भाग्याचा नाश करून सर्वसौख्य देणारी देवता आहे. दुर्वास ऋषींनी दिलेल्या देवप्रसादाचा उन्मत्त इंद्राने अपमान केला, तेव्हा ‘तुम्हा देवांची सर्व संपदा क्षीरसागरात जावो,’ असा त्यांनी शाप दिला. पर्यायाने लक्ष्मीदेखील सागरात गेल्या. देव-दैत्यांनी सागरमंथन करताच जी चौदा रत्ने प्रकट झाली, त्यांपैकी एक म्हणजे लक्ष्मी. त्या प्रकट होताच ऐरावत, पुण्डरिक, वामन, कुमुद, अज्जन, पुष्पदंत, सार्वभौम, सुप्रतीक या आठ दिशांच्या धारणकर्त्या हत्तींनी त्यांना अभिषेक घातला. या देवतेच्या उपासनेने गजांत धन व समृद्धी लाभते. रात्री भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, उद्योजक महावीर गाठ, चंदुभाई ओसवाल, समीर शेठ, अवनी शेठ यांच्या हस्ते पालखीपूजन झाले. तुळजाभवानी देवीची अन्नपूर्णा फलाहार रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा बाळकृष्ण दादर्णे, महादेव बनकर, अमर झुगर, सारंग दादर्णे, राजाराम शिंगे, अनिल रावळ, आदिनाथ चिखलकर, चंद्रकांत जाधव यांनी बांधली.