शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत मिळणार ‘लोकसभे’च्या कामाचा भत्ता: पावणेदोन कोटींची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 13:50 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती असलेल्या ४१४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुमारे एक ...

ठळक मुद्देदोन दिवसांत मिळणार ‘लोकसभे’च्या कामाचा भत्ता: पावणेदोन कोटींची रक्कम ‘लोकमत’वृत्ताचा परिणाम : जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त ४१४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश

 

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती असलेल्या ४१४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुमारे एक कोटी ६७ लाख ७० हजारांचा अतिकालिक भत्ता दोन दिवसांत मिळणार आहे. याची बिले गुरुवारी कोषागार कार्यालयात पाठविण्यात आली असून ती मंजूर होतील, असे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. ‘लोकमत’मधून १० नोव्हेंबरला ‘लोकसभे’च्या भत्त्यापासून तीन हजार जण वंचित’ असे वृत्त देऊन या प्रश्नाला वाचा फोडली होती. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून तातडीने हालचाली झाल्या.लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागासह जिल्हा परिषद, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, आयकर विभाग, विक्रीकर विभाग, कृषी, आदी विभागांतील अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या कर्मचाºयांचा अतिकालिक भत्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांमध्ये नाराजीची भावना होती. त्याबाबत वृत्तपत्रातून वृत्त आल्यानंतर निवडणूक विभागाने तातडीने निवडणूक निधीतून महागाई भत्त्यासाठी सुमारे एक कोटी ६७ लाख ७० हजार रुपयांची बिले कोषागार कार्यालयात जमा केली आहेत. यामध्ये वर्ग-१चे अधिकारी ५९, वर्ग-२ चे अधिकारी ६८, वर्ग-३चे कर्मचारी २०७, वर्ग-४चे कर्मचारी ८० असे मिळून ४१४ जणांचा समावेश आहे. त्यांना मूळ वेतनाइतका भत्ता मिळणार आहे. हा भत्ता सरासरी जादा काम केलेल्यांबरोबरच कमी काम केलेल्यांनाही जवळपास सारखाच मिळणार असल्याचे दिसत आहे. ही रक्कम संबंधितांना दोन दिवसांत मिळणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. ही भत्त्याची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांसाठी आहे; परंतु अद्याप तालुकास्तरावर नियुक्ती असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांना भत्ता मिळालेला नाही.========================कोट...लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांसाठी दोन दिवसांत भत्ता मिळणार आहे. याबाबतची बिले गुरुवारी कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. तसेच तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाºयांचे भत्ते अद्याप देणे बाकी आहे. संबंधित अधिकाºयांना कर्मचाºयांची संख्या व किती निधी अपेक्षित आहे, याबाबत प्रस्ताव मागून आठवडा झाला; परंतु त्यांच्याकडून काहीच उत्तर आलेले नाही.- सतीश धुमाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी====================================================(प्रवीण देसाई)

 

टॅग्स :Electionनिवडणूकcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर