रायगडावरील राजसदरेवर जाण्यासाठी परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST2021-02-05T06:56:39+5:302021-02-05T06:56:39+5:30

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होण्यासाठी राज्यातून आणि बाहेरूनही अनेक शिवभक्त रायगडावर येत असतात. ...

Allow to go to the palace on Raigad | रायगडावरील राजसदरेवर जाण्यासाठी परवानगी द्या

रायगडावरील राजसदरेवर जाण्यासाठी परवानगी द्या

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होण्यासाठी राज्यातून आणि बाहेरूनही अनेक शिवभक्त रायगडावर येत असतात. मात्र, सध्या या ठिकाणी अनेक कामे सुरू असल्यामुळे त्यांना राजसदेरवर जाऊ दिले जात नाही. परंतु, काही नियम करून त्यांना राजसदरेवर जाण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी आपण केल्याची माहिती खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे यांनी दिली आहे.

त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की पावसाळा व लॉकडाऊन नंतर रायगड विकास प्राधिकरणाची सर्व कामे सुरू करण्यात आली आहेत. चित्त दरवाजा ते महादरवाजा मार्गाचे उर्वरित पायऱ्यांचे बांधकाम, संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे. चित्त दरवाजाच्या प्रदर्शनीय भागाचे काम प्राधिकरणामार्फत चुना, दगड, सुर्खी व बेलफळ या पारंपरिक बांधकाम साहित्याने पूर्ण केले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी पुरतत्त्व विभागाने चित्त दरवाजा येथे तात्पुरत्या स्वरुपात तिकीट खिडकी सुरू केली आली आहे. या खिडकीच्या दृश्य स्वरुपाबद्दल शिवभक्त व पर्यटकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. याबाबत पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक राजेंद्र यादव यांना माहिती देण्यात आली आहे. खिडकीचे दृश्य स्वरुप ऐतिहासिक पध्दतीचेच असावे अशा सूचनाही केल्या आहेत.

राजसदरेला शोभत नाही, अशा पध्दतीने बॅरिकेटस लावले आहेत ते तत्काळ काढावेत यासाठी पत्रव्यव्हार चालू आहे. मात्र अद्याप याबाबत उत्तर मिळाले नसल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Allow to go to the palace on Raigad