शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या स्मृतिदिनी गरजंूना मदतीचे वाटप

By admin | Updated: July 18, 2015 00:14 IST

प्रबोधनाचे पाऊल : करंबे कुटुंबीयांचा आदर्शवत उपक्रम

कोल्हापूर : आई ही एक देवता असून, ती नेहमी सर्वांचा चांगलाच विचार करीत आली आहे. प्रत्येकात आईचे मातृत्व आहे. त्यामुळे समाजाने आईची भूमिका बजावावी, असे आवाहन कणेरी मठाचे मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामी यांनी शुक्रवारी येथे केले. करंबे कुटुंबीयांनी आईच्या स्मृतिदिनी गरजूंना केलेली मदत आदर्शवत आहे, असेही त्यांनी सांगितले.शनिवार पेठेतील खोलखंडोबा हॉलमध्ये परिसरातील करंबे कुटुंबीयांतर्फे आई ताराबाई करंबे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त पारंपरिक खर्चाला फाटा देऊन गरजू व्यक्तींना मदत देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कलासाधना मंचासह परिसरातील मंडळांनी या उपक्रमाचे संयोजन केले.मुप्पीन स्वामी यांच्यासह उदय गायकवाड, सुमित्रादेवी शिंदे, नगरसेवक सत्यजित कदम, किशोर देशपांडे, प्रा. अमरसिंह शेळके, प्राचार्य अजेय दळवी, गजानन लिंगम, मुरलीधर गावडे, प्रशांत चिटणीस, एस. आर. पाटील, विलासराव मुळे, मिलिंद यादव, आदींच्या प्रमुख उपस्थितीत विलास पांडव यांना मदत, शिवाजी मराठा हायस्कूलमधील पन्नास मुलांना पादत्राणे, वालावलकर हायस्कूलमधील अकरा खेळाडूंना क्रीडासाहित्य आणि ग. गो. जाधव बालमंदिराला खेळणी, खोलखंडोबा बालमंदिराला शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन केलेल्या दाम्पत्यासह सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी कणेरी मठ येथील अनाथ मुलांच्या शिक्षण खर्चासाठी करंबे कुटुंबीयांनी मुप्पीन स्वामींकडे आर्थिक मदत सुपूर्द केली. चित्रकार विजय टिपुगडे यांनी प्रास्ताविक केले. प्रार्थना बेहरे यांनी सूत्रसंचालन केले. विजय पेंटर यांनी आभार मानले. यावेळी बाळासाहेब करंबे, राजेंद्र करंबे, आदी उपस्थित होेते. (प्रतिनिधी)