शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

शासन निर्णयानुसार १५व्या वित्त आयोग निधीचे वाटप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:49 IST

कोल्हापूर : केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाचे वितरण २६ जून २०२० रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे करण्यात यावे, ...

कोल्हापूर : केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाचे वितरण २६ जून २०२० रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे करण्यात यावे, अशी लेखी सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे. तसे पत्र कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना मंगळवारी पाठविण्यात आले आहे.

गेले चार महिने यावरून न्यायालयीन संघर्ष सुरू असून, याबाबत जिल्हा परिषद सदस्या वंदना मगदूम यांनी विभागीय आयुक्तांनाही माहिती दिली होती. तसेच न्यायालयाच्या निकालाचीही लेखी माहिती देण्यात आली होती. याबाबत मगदूम यांनी ७ नोव्हेंबर रोजी त्यांच्याकडे अर्ज करून त्यांच्याकडे या निधी वितरणाबाबत तक्रार करण्यात आली होती.

त्याची दखल घेत विभागीय आयुक्तांनी हे पत्र काढले असून, याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अमन मित्तल यांच्यावर पडली आहे. तसेच उच्च न्यायालयात आज, गुरुवारी याबाबत सुनावणी असल्याने आता त्याकडे लक्ष लागले आहे. विभागीय आयुक्तांच्या या पत्रामुळे मगदूम यांच्या मागणीला बळ मिळाल्याचे मानण्यात येते.