कोल्हापुरातील कथित लव्ह जिहाद प्रकरण: न्यायालयाने संशयितास सुनावली पोलीस कोठडी

By सचिन भोसले | Updated: November 3, 2022 16:28 IST2022-11-03T16:23:16+5:302022-11-03T16:28:04+5:30

संशयित बावीस वर्षीय तरुणावर पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Alleged love jihad case in Kolhapur: Suspect remanded to police custody till 8th november | कोल्हापुरातील कथित लव्ह जिहाद प्रकरण: न्यायालयाने संशयितास सुनावली पोलीस कोठडी

कोल्हापुरातील कथित लव्ह जिहाद प्रकरण: न्यायालयाने संशयितास सुनावली पोलीस कोठडी

कोल्हापूर: कोल्हापुरातील बेपत्ता अल्पवयीन मुलीसह युवकाला काल, बुधवारी रात्री संकेश्वर येथून ताब्यात घेण्यात आले. आज या संशयित युवकाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला आठ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

कोल्हापुरातून गेल्या काही दिवसापासून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. या मुलीचा शोध लागत नसल्याने लव्ह जिहादच्या संशयावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी काल, बुधवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या समोर आंदोलन करत पोलिसांना जाब विचारला होता.

त्यानंतर मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची आठ पथके विविध ठिकाणी रवाना झाली होती. त्यातील स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेच्या एका पथकाने संबंधित युवक व मुलीस बुधवारी रात्री संकेश्वर येथून ताब्यात घेतले. तत्पूर्वी दिवसभरात आंदोलन आणि मोठ्या घडामोडी घडल्या, तर संशयित तरुणाच्या जवळच्या नातेवाइकांसह मित्रमंडळींची कसून चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी संशयित बावीस वर्षीय तरुणावर जुना राजवाडा पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Alleged love jihad case in Kolhapur: Suspect remanded to police custody till 8th november