शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVIrus In Kolhapur : एमआयडीसीसह सर्व उद्योग रविवारपासून आठ दिवस बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 16:26 IST

CoronaVIrus In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी (औद्योगिक वसाहती) सह सर्व उद्योग, कारखाने रविवार (दि. १६ मे ) पुढील आठ दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय उद्योजकीय संघटनांनी घेतला आहे, अशी माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी गुरूवारी दिली.

ठळक मुद्देएमआयडीसीसह सर्व उद्योग रविवारपासून आठ दिवस बंद राहणार जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळणार : उद्योजकीय संघटनांची तयारी

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी (औद्योगिक वसाहती) सह सर्व उद्योग, कारखाने रविवार (दि. १६ मे ) पुढील आठ दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय उद्योजकीय संघटनांनी घेतला आहे, अशी माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी गुरूवारी दिली.सध्या लॉकडाऊन सुरू असला, तरी कोरोनाबाबतच्या सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅॅनिटायझरचा वापर, आदी नियमांचे पालन करून एमआयडीसी, उद्योग, कारखाने सुरू आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शनिवार (दि. १५) ते रविवार (दि. २३) पर्यंत आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर या लॉकडाऊनमध्ये सहभागी होण्याबाबतची भूमिका उद्योजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत जाहीर केली.

शनिवारी (दि. १५) मध्यरात्रीपासून दि. २३ मेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील उद्योग, कारखाने वगळता अन्य उद्योग, कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांनी केलेल्या काही मागण्या शासनापर्यंत पोहोचविणार असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले. यावेळी स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, गोशिमाचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, मॅॅकचे अध्यक्ष गोरख माळी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMIDCएमआयडीसीkolhapurकोल्हापूर