कोल्हापुर जिल्ह्यातील सर्व व्यवसाय शुक्रवारपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 PM2021-07-07T16:19:17+5:302021-07-07T16:26:09+5:30

Cpr Hospital Minister Kolhapur : एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात लस कमी येत असल्याने वशिलेबाजीने लस घेण्याचे प्रकार वाढले आहेत. सीपीआरमधील लसीकरण कक्षाकडे जाणारा जाळीचा दरवाजा उघडून येथील कर्मचारीच वशिल्याने लस देत असल्याचा व्हीडीओ मंगळवारी सायंकाळपासून समाजमाध्यमावर फिरत आहे. याहीआधी अशा तक्रारी झाल्यानंतरही सीपीआरचे वरिष्ठ याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

All businesses in Kolhapur district will start from Friday | कोल्हापुर जिल्ह्यातील सर्व व्यवसाय शुक्रवारपासून सुरू होणार

कोल्हापूर जिल्ह्यातील व्यवसाय सुरु करण्यास परवानगी मिळावी, याबाबत आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेवून चर्चा केली.

Next
ठळक मुद्देकोल्हापुर जिल्ह्यातील सर्व व्यवसाय शुक्रवारपासून सुरू होणारआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची माहिती

जयसिंगपूर : कोल्हापूर शहराच्या धर्तीवर जिल्ह्यातील इतर सर्व ठिकाणचे व्यवसाय शासनाच्या अटीस अधीन राहून शुक्रवारपासून सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

ज्या विभागामध्ये बाधित रुग्णांची संख्या कमी आहे, अशा जिल्ह्यातील सर्व शहरे आणि गावामधील छोटे-मोठे व्यवसाय सुरू व्हावेत. यासाठी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मागणी केली होती.
राज्यमंत्री यड्रावकर यांनी केलेल्या या प्रयत्नाला यश आले असून शुक्रवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय व उद्योग सुरू करण्यास मुभा मिळणार आहे.
 

कोल्हापूर शहराबरोबराच ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय सातत्याने बंद राहत असल्यामुळे हा सर्व व्यापारी वर्ग अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. व्यापाऱ्यांची अडचण लक्षात घेवून शुक्रवारपासून शासन नियमानुसार सर्व व्यवहार सुरु होणार आहेत.
- डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर,
राज्यमंत्री

Web Title: All businesses in Kolhapur district will start from Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.