शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
2
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
3
कपिल शर्माला टक्कर द्यायला येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
4
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
5
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
6
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
7
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
8
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
9
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
10
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
11
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
12
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
13
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
14
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
15
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
16
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
17
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
18
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
19
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
20
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद

Kolhapur: पैसे लपविण्यासाठी अक्षयने घरात उभारली छुपी खोली, पोलिस चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 4:19 PM

अलिशान कार, दागिन्यांची लावली विल्हेवाट

कोल्हापूर : सान्विक वेल्थ मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा अटकेतील संशयित अक्षय अनिल कांबळे (वय २९, रा. सादळे, ता. करवीर) याच्या सादळे येथील घराची पोलिसांनी मंगळवारी (दि. २६) झडती घेतली. घरात पैसे ठेवण्यासाठी तयार केलेली छुपी खोली पाहून पोलिस चक्रावले. पाच अलिशान कार आणि बँकेत ठेवलेल्या सुमारे ७६ तोळे दागिन्यांची त्याने मित्रांकरवी विल्हेवाट लावल्याची माहिती तपासातून समोर आली.अवघ्या चार महिन्यांत दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक घेणारा अक्षय कांबळे याने लाखो रुपयांची माया जमा केली होती. जग्वार, ऑडी, बीएमडब्ल्यू अशा अलिशान पाच कार त्याच्याकडे होत्या. १०० तोळ्यांपेक्षा अधिक दागिन्यांची खरेदी केली होती. त्याशिवाय काही नातेवाइकांच्या नावे मालमत्तांची खरेदी केल्याचेही चौकशीतून समोर येत आहे.

त्याच्या बँक खात्यांची माहिती पोलिसांना मिळाली असून, मोठ्या रकमांची देवाण - घेवाण कोणाशी झाली, याचा तपास केला जात आहे. त्याची पत्नी आणि आईच्या बँक खात्यांवरून काही संशयास्पद व्यवहार झाले आहेत. त्यांचीही चौकशी करणार असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक विशाल मुळे यांनी सांगितले.पोलिस परतलेकांबळे याच्या घर झडतीदरम्यान रोकड, दागिने, वाहने, किमती वस्तू असे काहीच पोलिसांना मिळाले नाही, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, घरातील एका बेडरुममध्ये कपाटामागे असलेला दरवाजा उघडला असता, तिथे छुपी खोली आढळली. रोकड, दागिने आणि चीजवस्तू लपविण्यासाठी छुप्या खोलीचा वापर केला जात होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली.कार, दागिने साथीदारांकडेआईच्या नावावर बँकेत ठेवलेले ७६ तोळे दागिने शिवाजी पेठेतील एका मित्राने आईवर दबाव टाकून सोडवून नेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले, तर एक कार माकडवाला वसाहतीमधील एका खासगी सावकाराकडे आहे. दुसरी कार शिवाजी पेठेतील एका मित्राकडे आहे. गुंतवणुकीच्या पैशातून घेतलेली सर्व वाहने, दागिने आणि महागड्या वस्तू जप्त करण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी तपास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.दिशाभूल करण्याचा प्रयत्नअटकेतील अक्षय कांबळे तपासात पोलिसांना प्रत्येकवेळी वेगळी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. गुन्ह्यातील काही साथीदारांना वाचविण्याचा तो प्रयत्न करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस