Kolhapur: ओ कलेक्टर गाड्या कुठे आहेत?, अजित पवार भडकले, नेमकं काय घडलं.. वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:46 IST2025-03-27T13:46:00+5:302025-03-27T13:46:27+5:30
कोल्हापूर : रोखठोक अन् तडकाफडकी निर्णयामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी चर्चेत असतात. असाच काहीसा प्रसंग आज कोल्हापुरात घडला. ...

Kolhapur: ओ कलेक्टर गाड्या कुठे आहेत?, अजित पवार भडकले, नेमकं काय घडलं.. वाचा सविस्तर
कोल्हापूर : रोखठोक अन् तडकाफडकी निर्णयामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी चर्चेत असतात. असाच काहीसा प्रसंग आज कोल्हापुरात घडला. कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादांच्या ताफ्यातील वाहन खराब असल्याने दादांचा पारा चढला. ओ कलेक्टर गाड्या कुठे आहेत म्हणत अजित पवार भडकले अन् त्यांनी आता ऑर्डर देतो दोन गाड्या घेवून टाका असा आदेशच दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. सकाळी ११.१५ वाजता त्यांचे विमानतळावर आगमन झाले. यानंतर ते नंतर मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. यावेळी त्याच्या ताफ्यातील वाहन खराब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर अजितदादाचा पारा चढला. जिल्हाधिकारी कार्यालयात पोहताच अजितदादांनी ओ कलेक्टर गाड्या कुठे आहेत अशी विचारणा केली. इतकच नाही तर थेट ऑर्डरच देत दोन गाड्या घेवून टाका असा आदेशच दिला. घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
अधिकाऱ्यांच्या बैठकीसह विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित
सकाळी ११.४५ ते १ वाजता जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत विकास कामासंदर्भात चर्चा करणार आहेत. दुपारी २.४५ वाजता महेश को. ऑप.स्पीनिंग मिल्स लि. इचलकरंजी ता. हातकणंगले येथे भेट देणार आहेत. दुपारी ३.१५ वाजता राष्ट्रवादी भवन, राजाराम स्टेडिअम, बंगला रोड, इचलकरंजी येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी व नागरिकांशी संवाद साधणार. सायंकाळी ४.३० वाजता इचलकरंजी महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचा आढावा घेणार आहेत. सायंकाळी ६ वाजता कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण व समारोप समारंभानंतर रात्री ९.३० वाजता विमानाने पुण्याकडे प्रयाण करणार.