शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

प्लँचेट अहवालाबाबत अजित पवार अनभिज्ञ

By admin | Updated: February 26, 2015 00:53 IST

गुलाबराव पोळ यांच्या वकिलांचा टोला

कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाच्या तपासात तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी प्लॅँचेटचा वापर केला नसल्याचा चौकशी अहवाल शासनाला प्राप्त झालेला आहे. कदाचित त्यांच्याच सरकारने नेमलेल्या अधिकाऱ्यांचा अहवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहीत नसावा, असा टोला गुलाबराव पोळ यांचे वकील अ‍ॅड. प्रकाश मोरे यांनी बुधवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत लगावला. डॉ. दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी पोळ यांनी प्लॅँचेटचा वापर केल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांत केली होती. यावर तत्कालीन सरकारने अप्पर पोलीस महानिरीक्षक व्ही. डी. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने अहवाल दिला असून, यामध्ये दाभोलकर यांच्या तपासात पोळ यांनी प्लॅँचेटचा वापर केला नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आल्याचे अ‍ॅड. मोरे यांंनी सांगितले. चौकशीदरम्यान अर्जदार, साक्षीदार, गैरअर्जदार यांचे जबाब नोंदविले. तसेच गोपनीय माहिती काढली असता, डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासासाठी प्लॅँचेट, सुपरनॅचरल पॉवर, सियान्स, तंत्रमंत्र विद्येचा वापर झाल्याचे निष्पन्न होत नाही. त्याबाबत कोणताही सबळ अथवा ठोस पुरावा चौकशीअंती दिसून आला नसल्याचे अहवालात म्हटले आहे, असेही त्यांनी सांगितले.पुणे येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्लॅँचेटप्रकरणी गुलाबराव पोळ यांची बदली केल्याचा खळबळजनक आरोप केल्याबद्दल विचारले असता, अ‍ॅड. मोरे म्हणाले, गुलाबराव पोळ यांची बदली ४ मार्च २०१४ झाली आणि प्लॅँचेटची तक्रार जुलै २०१४ मध्ये झाली. दोन्ही घटनांमध्ये तीन महिन्यांचे अंतर असल्याने अजित पवार यांचे वक्तव्य वस्तुस्थितीला धरून नाही. कदाचित त्यांच्या सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल त्यांना माहीत नसेल.