शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

मराठा आरक्षणाविषयी शासनाच्याच मनात पाल चुकचुकतेय : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 16:27 IST

शासनाने दिलेल्या मराठा आरक्षणाबद्दल सरकारच्या मनातच पाल चुकचुकते आहे. त्यामुळे न्यायालयात निष्णांत वकिलांची फौज उभी करू, असे सरकारमधीलच काही मंत्री सांगत आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री अजित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.

ठळक मुद्दे'मराठा आरक्षणाविषयी शासनाच्याच मनात पाल चुकचुकतेय' 'न्यायालयात निष्णांत वकिलांची फौज उभी करू म्हणणारे शासनच द्विधावस्थेत''धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजालाही आरक्षण दिले पाहिजे'

कोल्हापूर /इचलकरंजी : शासनाने दिलेल्या मराठा आरक्षणाबद्दलसरकारच्या मनातच पाल चुकचुकते आहे. त्यामुळे न्यायालयात निष्णांत वकिलांची फौज उभी करू, असे सरकारमधीलच काही मंत्री सांगत आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री अजित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.केंद्रात आणि राज्यात भाजपाचेच सरकार आहे. त्यामुळे मराठा आरक्षण कायमपणे टिकले पाहिजे, असा मसुदा करणे राज्य शासनाकडून अपेक्षित आहे. राज्यात लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर आम्हा सर्वांच्या एकमुखी पाठिंब्यावर शासनाने मराठा समाजाला एसईबीसी हे आरक्षण घोषित केले.

ते टिकविण्याचे शासनानेच काम आहे, असे सांगून पवार पुढे म्हणाले, ५२ टक्के आरक्षणाला धक्का न पोहचता शासनाने आता धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजालाही आरक्षण दिले पाहिजे.

...मग भाजपच ईव्हीएम बदला असे म्हणेल  : अजित पवार

काळजी करू नका, योग्य चिन्हांचे बटण दाबा मग भाजपच ईव्हीएम बदला असे म्हणेल, माझा ईव्हीएम मशीनवर विश्वास आहे, कर्नाटक , पंजाब आणि पाच राज्यांचे निकाल याच मशीनमधून आल्याचे माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले. 

अजित पवार हे इचलकरंजी येथील  बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला आले होते, या समारंभात पवार यानी सरकारवर चौफेर टीका केली. सध्याचे सरकार शेतकरी विरोधात आहे, अशी टीका करून निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला राम, हनुमान आठवतो, असे पवार म्हणाले. 

मुख्यमंत्री, महसूल मंत्री, वस्त्रउद्योग मंत्री नुसता फसव्या घोषणा करतात. कसलीही कृती त्यांच्याकडून होत नाही, राज्यातील वस्त्रउद्योग धंद्याची या सरकारने वाट लावली आहे. केंद्रातले सरकार व राज्यातले सरकार हे फसवे आहे, असाही आरोप पवार यांनी केला.

काँगेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील यद्रावकर, उदय लोखंडे उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणGovernmentसरकारkolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारDhangar Reservationधनगर आरक्षण