शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार यांनी कोल्हापुरात घेतलं होतं महाविद्यालयीन शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 12:41 IST

Ajit Pawar Death in Plane Crash: 'पूरग्रस्त दौरे' कायमचे आठवणीत राहणारे आहेत.

कोल्हापूर : महापूर असो वा कोरानाचे संकट, जिल्ह्याच्या पाठीशी उपमुख्यमंत्री अजित पवार मदतीसाठी धावून आले होते. जुलै २०२१ मध्ये शिरोळ तालुक्याला महापुराने वेढले होते. जनजीवन विस्कळीत झालेले असताना पवार यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयात उभारलेल्या पूरग्रस्त निवारा केंद्राला त्यांनी भेट दिली होती. संकट काळात धावून येणारा नेता म्हणून शिरोळच्या जनतेच्या आठवणीत त्यांचे हे 'पूरग्रस्त दौरे' कायमचे आठवणीत राहणारे आहेत.भुदरगड तालुक्यात माजी आमदार के. पी. पाटील हे अजितदादांचे निकटवर्तीय मानले जात. मुदाळ येथे २३ मे २०२५ रोजी के. पी. पाटील यांच्या 'घरवापसी' निमित्त आयोजित सभेला अजितदादा उपस्थित होते. सभेदरम्यान अचानक पाऊस सुरू झाला. मात्र, पावसाची तमा न बाळगता अजितदादांनी पावसातच भाषण सुरू ठेवले.

अन् ‘अजितदादां’नी फेटा बांधलाच नाही, नेमकं काय होतं कारण.. वाचा सविस्तरआजरा अर्बन बँकेचा सुवर्णमहोत्सव सांगता समारंभ व आजरा सूतगिरणीच्या नवीन इमारतीचा कोनशिला कार्यक्रम २०११ मध्ये झाला होता. या कार्यक्रमाला अजित पवार आजऱ्यात आले होते. आजरा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता असल्याचे समजताच त्यांनी शहराच्या विकासासाठी एक कोटीचा निधी दिला होता. इचलकरंजी जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न शहराच्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच सुळकूड योजनेला मंजुरी दिली होती. त्यांचे वस्त्रनगरीशी अतूट नाते होते.कोल्हापुरात पवारांचे शिक्षणअजित पवार यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी वर्ष १९७८ मध्ये कोल्हापुरातील शहाजी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्यावेळी शहाजी महाविद्यालय रंकाळा परिसरातील शालिनी पॅलेस येथे भरत होते. अजित पवार यांनी या महाविद्यालयात एक्स्टर्नल (बाह्य विद्यार्थी) प्रवेश घेतला होता. त्यावेळी ते १८ वर्षांचे होते. त्यामुळे ते परीक्षा असो किंवा अन्य कारणांनी ते कोल्हापुरात येत असत. त्यातून त्यांचा मित्रपरिवार तयार झाला होता. कोल्हापूरला आले की ते फियाट कार, दुचाकीवरून शहरात फेरफटका मारत असत. जेव्हा-जेव्हा ते महाविद्यालयात असत त्यावेळी ते माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्या निवासस्थानी राहत होते. 

Ajit Pawar Funeral Live: अजित पवार अनंतात विलीन, दादांना अखेरचा निरोप देताना महाराष्ट्र हळहळला

हद्दवाढीसाठी दादा आग्रहीकोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याची जाणीव अजित पवार यांना होती; परंतु निर्णय घेता येत नव्हता. गतवर्षी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजवंदन समारंभात पवार यांनी या विषयाला हात घातला. दोन्ही बाजूंना विश्वासात घेऊन हा प्रश्न सोडविला जाईल, असे पवारांनी सांगितले होते. त्यानंतर ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमावेळी झालेल्या मेळाव्यात देखील पवार यांनी हद्दवाढीचा विषय काढला. एवढेच नाही तर हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूरचा विकास वाढणार नाही, याची जाणीव ठेवून दोन्ही बाजूंनी समजूतदारपणाची भूमिका घ्यावी, असे आवाहन केले होते. झटपट निर्णय घेण्यात माहिर असणाऱ्या पवार यांना घेण्यात अडचणी आल्या; परंतु हद्दवाढ झालीच पाहिजे, यासाठी त्यांनी सतत आग्रह धरला होता.

अजित पवारांमुळे रंकाळा झाला जलपर्णीमुक्तकोल्हापुरातील रंकाळा तलाव वर्ष २००८ मध्ये जलपर्णीने पूर्णपणे वेढला गेला होता. जलपर्णी कशी काढायची, हा यक्षप्रश्न होता. अजित पवार यांना ही माहिती कळताच त्यांनी एके दिवशी सायंकाळी तलावाला भेट दिली. विजय सिंघल आयुक्त, तर उदय साळोखे महापौर होते. त्यांनी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आवाहन केले. पवार यांनी तेथेच सांगितले, मी सगळी यंत्रणा देतो, फक्त डिझेलचा खर्च महानगरपालिकेने करावा. पवारांची अट आयुक्तांनी तत्काळ मान्य केली. त्यानंतर जलपर्णी उपसण्याकरिता जलसंपदा विभागाची मोठी यंत्रे तत्काळ पोहोचली आणि रंकाळा स्वच्छतेची मोहीम सुरू झाली. आज आपण रंकाळा जलपर्णीमुक्त पाहतो तो अजित पवारांमुळे. पवार महापालिकेच्या पाठीशी उभे राहिले नसते तर रंकाळा इतिहासजमा झाला असता. लोक आजही ही आठवण जागवतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's college education was in Kolhapur: A look back.

Web Summary : Ajit Pawar's strong Kolhapur connection is highlighted, from disaster relief to development initiatives. He studied at Shahaji College, maintaining close ties. He aided Kolhapur's growth, including solving water issues and cleaning Rankala lake, showing commitment.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामतीkolhapurकोल्हापूरEducationशिक्षण