शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अन् ‘अजितदादां’नी फेटा बांधलाच नाही, नेमकं काय होतं कारण.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 12:57 IST

'एक नव्हे हजार फेटे बांधीन’

राम मगदूमगडहिंग्लज : ‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही ‘गडहिंग्लज-चंदगड’शी अतूट नाते होते. तत्कालीन आमदार राजेश पाटील यांचा पराभव जिव्हारी लागल्याने अडकूरच्या नागरी सत्कार सोहळ्यात त्यांनी फेटा बांधलाच नाही. त्यावेळी म्हणाले होते..‘मी चंदगडला भरभरून दिले..तरीही माझ्या शिलेदाराचा पराभव झाल्याचे शल्य आहे. त्यांना पुन्हा आमदार करा, एक नव्हे हजार फेटे बांधीन’.भाजपसोबत ते सत्तेत सहभागी झाले त्यावेळी राजेश पाटीलही त्यांच्यासोबत गेले. संध्यादेवी कुपेकर शरद पवार यांच्या पाठिशी राहिल्या. परंतु, चंदगड नगरपंचायतीच्यानिमित्ताने राजेश पाटील व नंदिनी बाभूळकर यांनी जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला. किंबहुना, राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची ‘नांदी’ चंदगडमधूनच झाली. त्याबद्दल त्यांनी राजेश पाटील यांचे विशेष कौतुकही केले होते. 

Ajit Pawar Funeral Live: अजित पवार अनंतात विलीन, दादांना अखेरचा निरोप देताना महाराष्ट्र हळहळला१० फेब्रुवारी २०२४ रोजी नूल येथील सुरगीश्वर मठ सांस्कृतिक भवन आणि चंदगड नगरपंचायत इमारत भूमीपूजननिमित्ताने ते गडहिंग्लजला आले होते. त्यावेळी आजºयातील नियोजित किटवडे धरण बांधून गडहिंग्लज पूर्वभागाच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याच्या शब्दही त्यांनी शेतकºयांना दिला होता.चंदगडकरांनी सत्कार केला आणि विरोधी पक्षनेत्याचा उपमुख्यमंत्री झालो. तुमच्या सत्काराने आणखी कांहीतरी मोठं माझ्या पदरी पडू शकते, अशी मिश्किल टीपणीही त्यांनी केली होती. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेच्या नेसरीतील प्रचारसभेत पर्यटनातून विकास आणि रोजगारनिर्मितीसाठी चंदगडला दुप्पट निधी देण्याचे आश्वासन दिले होते. तद्वत, दौलत खाली करा, आम्ही चालवतो, असा इशाराही त्यांनी विरोधी उमेदवार मानसिंग खोराटेंना देत राजेशना मोठी ताकद दिली होती. तरीही पराभव झाल्यानंतर ‘राजेश काळजी करू नका, चंदगडची बांधणी नव्याने करा’ या शब्दात धीरही दिला होता.  

वाचा: अजितदादांचे सडोली खालसाच्या माळावर कोल्हापुरातील अखेरचे भाषण, आठवणीने कार्यकर्ते गहिवरलेअजितदादा व राजेश पाटील यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे दादा मुख्यमंत्री झाल्याशिवाय आपला वाढदिवस जाहीरपणे साजरा करणार नाही, असे राजेश यांनी महागावमध्ये जाहीर केले होते. विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यास ‘चंदगड-गडहिंग्लज’मधून दोन आमदार देण्याचा शब्द त्यांनी अजितदादांना अडकूरच्या सभेत दिला होता.कागल तालुक्याशी ऋणानुबंधकागल : पवार कुटुंबीय आणि कागल तालुक्याचे नाते गेली चाळीस वर्षाहून अधिक काळ अतुट राहीले आहे . पाझर तलाव मिनी गोवा पर्यटन केंद्र उद्घाटन सोहळ्यासाठी ते आले होते. त्यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम महायुतीची उमेदवारी मुश्रीफांना जाहीर केली होती. मंत्री मुश्रीफांनी अनेकदा सांगितले आहे की, त्यांना मी माझे नवीन घरही दाखविले नाही कारण त्यांना यामध्ये अनेक त्रुटीच दिसतील व ते स्पष्टपणे सांगतीलही. कागलमधील श्रीराम मंदिर पाहताना त्यांनी खांबांची संख्या कमी करता आली असती हे सांगताना छताचे वजन आणि पिलर संख्या याचे गणित मांडून दाखविले. दोन वर्षापूर्वी 28 जानेवारी 2024 रोजी मौजे सांगाव येथे शेतकरी मेळाव्यास उपस्थित होते. याआठवणीने कागलकरांना सुन्न केलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's Kolhapur Visit: Why He Refused to Wear a 'Feta'

Web Summary : Ajit Pawar's bond with Gadhinglaj-Chandgad was strong. Disappointed by a loyalist's defeat, he refused a 'Feta', promising one if his man won again. He pledged development funds and maintained close ties with the region.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामतीDeathमृत्यूkolhapurकोल्हापूर