ऐनवेळच्या पावसाने जागवली रात्र, दुपारी उडवली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:53 PM2021-02-18T16:53:49+5:302021-02-18T16:55:16+5:30

Rain Kolhapur- ढगांचा गडगडाट आणि विजांच्या लखलखाटासह आलेल्या या पावसाने संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत टप्प्या टप्याने हजेरी लावत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. गुरुवारी दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावत सर्वाचीच तारांबळ उडवली.

Ainvel's rain woke up the night, the afternoon blew the cable | ऐनवेळच्या पावसाने जागवली रात्र, दुपारी उडवली तारांबळ

ऐनवेळच्या पावसाने जागवली रात्र, दुपारी उडवली तारांबळ

Next
ठळक मुद्देऐनवेळच्या पावसाने जागवली रात्र, दुपारी उडवली तारांबळढगांचा गडगडाट आणि विजांच्या लखलखाटासह सलग दोन दिवस जिल्हाभर पाऊस

कोल्हापूर: ओडीसाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळसदृश्य हवेच्या दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचा परिणाम होऊन निरभ्र आभाळ आणि कोरडे हवामान असतानाही बुधवारच्या रात्री अचानक पावसाने एन्ट्री केली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या लखलखाटासह आलेल्या या पावसाने संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत टप्प्या टप्याने हजेरी लावत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. गुरुवारी दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावत सर्वाचीच तारांबळ उडवली.

हवामान खात्याने १७ ते १८ रोजी विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला होता. तो बुधवारी कोल्हापुरात तंतोतंत खरा ठरला. सोमवारपासून जिल्ह्यात दाट धुके पडत आहे. दवही जास्त असल्याने पहाटे झाडावरुन पाण्याचे थेंबही पडत आहेत. सकाळी गारवा आणि दिवसभर कडक उन्हाचे चटकेही बसत आहेत.

बुधवारी सकाळीही असेच धूके होते, त्यानंतर कडक उन पडले. दुपारी दोन नंतर मात्र वातावरण अचानक ढगाळ झाले. गार वारेही जोरात वाहू लागले. संध्याकाळी गडहिग्लज, आजरा परिसरात पावसाने हजेरीही लावली. रात्री दहानंतर पुन्हा विजांचा कडकडाट सुरु झाला आणि पावसाला सुरुवात झाली.

कोल्हापूर शहर परिसरात दीडच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. जवळपास तासभर पाऊस पडत होता. दरम्यान गुरुवारीही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. सकाळी ढगाळ वातावरण दिसत होते. दहानंतर ते निवळले, गारवा कमी होऊन उष्माही वाढला पण दुपारी दोन नंतर पुन्हा आभाळ भरुन आले आणि पावसाने ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावली. पावसाचा जोर मध्यरात्रीपर्यंत राहील आणि त्यानंतर शुक्रवारी वातावरण पुर्णपणे निवळेल असा हवामान खात्याने सांगितले आहे.

 

Web Title: Ainvel's rain woke up the night, the afternoon blew the cable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.