शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

कोल्हापूर विभागातील शेतीला साडेतीन हजार कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 6:57 AM

गेल्या पंधरा दिवसांपासून थैमान घातलेल्या महापुरामुळे कोल्हापूर विभागात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतील दोन लाख हेक्टरवरील म्हणजेच ५ लाख एकरातील पिके कुजली आहेत.

- वसंत भोसलेकोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून थैमान घातलेल्या महापुरामुळे कोल्हापूर विभागात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतील दोन लाख हेक्टरवरील म्हणजेच ५ लाख एकरातील पिके कुजली आहेत. यामुळे प्रती एकरी सरासरी किमान ७० हजार रुपये उत्पन्न गृहीत धरले, तरी सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा फटका साडेपाच लाखांवर शेतकऱ्यांना बसला आहे. यात जिरायती, बागायती क्षेत्रांतील पिकांसह फळबागांचा समावेश आहे.अजून पंचनामे झाले नसले, तरी तलाठी व सर्कलकडून घेतलेल्या नजरअंदाज पाहणीनुसार, कृषी विभागाने हा अहवाल तयार केला आहे. यात कोल्हापूर विभागात मोडणाºया तीन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान कोल्हापूर जिल्ह्याचे झाल्याचे दिसत आहे, त्या खालोखाल सातारा आणि त्यानंतर सांगलीचा क्रमांक लागतो. कोल्हापूर जिल्ह्यात केवळ ऊसाचेच १,२०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.आॅगस्टच्या सुरुवातीपासूनच संततधार बरसलेल्या पावसामुळे तीन जिल्ह्यांतील महापुराने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत घरादारांसह आजूबाजूची शेतीही कवेत घेतली. नदीकाठच्या पिकांसह जवळपास दीड-दोन किलोमीटर परिसरातील सर्व पिके पाण्याखाली गेली. सलग पडणारा पाऊस आणि आठ दिवसांहून अधिक काळ महापुराच्या पाण्यात ही पिके राहिल्याने पूर्णपणे कुजली आहेत, यात ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग या प्रमुख पिकांसह कडधान्य पिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. सर्वाधिक फटका ऊस आणि भात पिकाला बसला आहे.कृषी विभागाने तयार केलेल्या नजरअंदाज अहवालात जिरायती, बागायती आणि फळ पीक असे हेक्टरनिहाय वर्गीकरण करण्यात आले आहे. जिरायतीमध्ये दोन लाख ५१ हजार ८१४ शेतकºयांचे ७२ हजार ६२२ हेक्टरवरील पिके पूरबाधित आहे. बागायतीमध्ये दोन लाख ८६ हजार १९९ शेतकºयांचे एक लाख १५ हजार १३ हेक्टरवरील पीक बाधित आहे. फळपिकांमध्ये समाविष्ट असलेल्या केळी, द्राक्षांसह अन्य फळपिकांचे २६ हजार ३४९ शेतकºयांचे एक लाख १७0८ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे.नुकसानीचा आकडा वाढणारकितीही कमी उत्पादन झाले तरी तरी एकरी किमान सरासरी ७० हजार रुपयांचे उत्पन्न शेतकºयांच्या हाती लागतेच. ऊस तसेच अन्य बागायती पिकांचे, फळबांगाचे उत्पन्न यापेक्षा कितीतरी अधीक असते. त्यामुळे नुकसानीचा हा आकडा साडेतीन हजार कोटी रुपयापेक्षांही अधिक असू शकतो.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरagricultureशेती