शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

Kolhapur politics: राष्ट्रवादीचा चिरेबंदी वाडा ढासळतोय, चंदगडमध्ये राजेश पाटील यांना पुन्हा घ्यावे लागणार कष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:22 IST

निंगाप्पा बोकडे चंदगड : गेल्या पाच विधानसभा निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य असलेला चिरेबंदी वाडा यंदा अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील ...

निंगाप्पा बोकडेचंदगड : गेल्या पाच विधानसभा निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य असलेला चिरेबंदी वाडा यंदा अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील हे मोठ्या फरकाने निवडून आल्याने ढासळला आहे. त्यामुळे आमदार राजेश पाटील यांना त्या वाड्याची डागडुजी पुन्हा करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत.२००९ मध्ये विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर माजी आमदार स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर २०१३ साली त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या पत्नी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळवला. २०१४ मध्येही त्यांनी या मतदारसंघांमध्ये विजय मिळवत या मतदारसंघावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध केले. पुढे २०१९ मध्ये मात्र त्यांनी प्रकृतीचे कारण सांगून माघार घेतली. त्याचवेळी मतदारसंघाची धुरा सांभाळणाऱ्या त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांना कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला. मात्र, त्यांनीही काही कारणास्तव विधानसभा निवडणूक लढवली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजेश पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून संधी दिली. कार्यकर्त्यांनीही जिवाची बाजी लावून त्यांना आमदार केले; पण गेल्या काही वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आणि अजित पवार गट व शरद पवार गट, असे दोन गट राष्ट्रवादीमध्ये पडले. आमदार राजेश पाटील अजित पवार गटासोबत गेले. त्यानंतरही राजेश पाटील यांनीही हा राष्ट्रवादीचा चिरेबंदी वाडा ढासळू नये, याची पुरेपूर काळजी घेतली.

मात्र, मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्याने कार्यकर्त्यांची फळी विभागली गेल्याने पक्षाची ताकद कमी झाली. दरम्यान, याच काळात सातत्याने मतदारसंघात ठाण मांडून राहिलेल्या भाजपाच्या शिवाजी पाटील यांनी महायुती सरकार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने भाजपच्या चंदगड मतदारसंघात चांगला जम बसविला. महायुतीच्या फार्म्युल्यानुसार चंदगडची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला असतानाही बंडाचे निशाण फडकावत शिवाजीराव पाटील यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरून बाजी मारली.राष्ट्रवादी अभेद्य बनविणार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आजही माझ्या पाठीशी खंबीर आहेत. त्यामुळे झालेल्या पराभवाचे आत्मचिंतन करून त्यांना पुन्हा ताकद देऊन राष्ट्रवादीचा हा वाडा अभेद्य बनविणार असल्याचे राजेश पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandgad-acचंदगडNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024